Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Raigad Crime: उन्हाळी सुट्टीसाठी गावी आली अन् थेट जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली.

Raigad Crime: उन्हाळी सुट्टीसाठी गावी आली अन् थेट जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली.

  • १५ वर्षीय निधी उतेकर हिचा जंगलात मृतदेह आढळला.
  • मृतदेहावर जखमांचे निशाण असल्याने खुनाचा संशय.
  • रायगडमध्ये महिनाभरात सलग खूनप्रकरणांमुळे भीतीचे वातावरण.
रायगड:रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
उन्हाळी सुट्टीसाठी १५ वर्षीय मुलगी गावाला आली होती. मोबाईलवर बोलत ती घराबाहेर निघाली आणि थेट जंगलात तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या मुलीचे नाव निधी राकेश उतेकर असे आहे. तिच्या अश्या मृत्यूने हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Nagpur Crime: भीषण प्रकार! जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; स्त्री-पुरुष ओळखणंही कठीण

काय घडलं नेमकं?

निधी ही आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील विलेपार्ले येथे राहत होती. मात्र उन्हाळी सुट्ट्यांमुळे ती आई-वडील आणि भावासह माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे गावी आली होती. निधी ही विलेपार्ले येथील सेंट जेव्हियर्स शाळेत शिक्षण घेत होती आणि नुकतीच नववीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. सोमवारी (२५ मे) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास निधी वडिलांच्या मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली. मात्र ती परत आलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध रात्रभर घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही. कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. बुधवारी (२७ मे) घरोशीवाडी परिसरातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी निधीच्या कुटुंबियांना घटनास्थळी बोलावले असता मृतदेह निधीचाच असल्याचे स्पष्ट झाले.

हत्येचा संशय, पोलीस तपास सुरु

जंगलात सापडलेल्या मृतदेहावर जखमांचे निशाण होते, निर्जन जंगलभागात सापडलेल्या मृतदेहा वरील जखमा पाहता हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. २४ तासात रायगड जिल्ह्यातील हत्येची ही दुसरी घटना असल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात रायगड जिल्ह्यात घडलेल्या सलग खूनाच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Chandigarh Crime: 'धुरंधर'च्या प्रॉडक्शन डिझायनरवर गंभीर आरोप, आरोपीची जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

रायगड हादरला! खालापूरमध्ये वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या

रायगड जिल्ह्यातून एक दुहेरी हत्या कांडाची घटना समोर आली आहे. एका वृद्ध जोडप्याचा गळा चिरून निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घडलेली घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका येथील निकडोली गावात मंगळवारी घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra