Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Raj Thackeray: मंदिरातही श्रद्धेची लूट? सिद्धीविनायक, राम मंदिराचा उल्लेख करत राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Raj Thackeray: मंदिरातही श्रद्धेची लूट? सिद्धीविनायक, राम मंदिराचा उल्लेख करत राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

  • ‘सिद्धीविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची चोरी’
  • राज ठाकरेंचा गंभीर आरोप
  • सिद्धीविनायक आणि राम मंदिरावरील राज ठाकरेंचे मोठे दावे
Raj Thackeray Speech News Marathi: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत (Mumbai News) आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंदिरांतील दानपेट्यांमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली.
विशेषतः मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला.

सिद्धीविनायक मंदिराबाबत काय म्हणाले?

राज ठाकरे म्हणाले की, त्यांच्याकडे सिद्धीविनायक मंदिर न्यासासंदर्भातील एक पत्र आले आहे. त्या पत्रात मंदिरातील दानपेटीतील रकमेच्या कथित गैरव्यवहाराचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कर्मचारी पकडले जाण्यापूर्वी दर बुधवारी दानपेटीतील मोजणी 50 लाख रुपयांच्या आसपास होत होती. मात्र संबंधित कर्मचारी पकडल्यानंतर हीच रक्कम 1.5 कोटी रुपयांपर्यंत वाढली. यावरून दर आठवड्याला मोठ्या प्रमाणात रक्कम लंपास होत असल्याचा दावा त्यांनी केला. राज ठाकरे यांनी या प्रकारामागील धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

Amit Thackeray Speech: 'मी विसरलो, खरंच सुचत नाही…', अमित ठाकरे भाषणात अचानक थांबले, सभागृहात क्षणभर शांतता

‘श्रद्धेचीही चोरी होत आहे’

यावेळी त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “भाविक श्रद्धेने मंदिरात जाऊन दान करतात. विद्यार्थी परीक्षेपूर्वी देवदर्शनासाठी मंदिरात जातात. पण त्याच मंदिरातील दानपेटीतील पैसे चोरीला जात असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.” मंदिर प्रशासन आणि विश्वस्तांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राम मंदिराचाही केला उल्लेख

भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराचाही उल्लेख केला. त्यांनी राम मंदिर हे देशाच्या भावनांशी जोडलेले असल्याचे सांगत, तेथे 1,400 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा दावा केला आणि या विषयावर सरकार मौन का बाळगते, असा सवाल उपस्थित केला. तसेच राम मंदिराच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीचा उल्लेख करत, अशा आरोपांवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राजकीय चर्चांना उधाण

राज ठाकरे यांनी सिद्धीविनायक मंदिर आणि राम मंदिराबाबत केलेल्या या आरोपांमुळे राज्यातील आणि राष्ट्रीय राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या विधानांवर संबंधित यंत्रणा किंवा सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे.

Abhijeet Dipke on BJP IT Cell: विद्यार्थ्यांच्या आधी भाजपच्या आयटीसेलवर गुन्हा दाखल करा…: अभिजीत दिपकेंचा इशारा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra