Dailyhunt
Rakhi Sawant : राखीची पुन्हा लग्न करण्याची इच्छा! म्हणाली "मी इस्लाम सोडलेला.", मौलानाशी करायचंय लग्न

Rakhi Sawant : राखीची पुन्हा लग्न करण्याची इच्छा! म्हणाली "मी इस्लाम सोडलेला.", मौलानाशी करायचंय लग्न

  • काही कारणांमुळे तिचे दोन्ही नाते तुटले आहेत
  • तिला पुन्हा एकदा लग्न करायचं आहे आणि यंदा तिचे फर्माइशे काही औरच आहेत
  • राकेशकडून तसा काही प्रतिसाद मिळाला नाही
राखी सावंत नेहमी तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते.
राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यंदाचे चर्चेचे कारण काही हटके आहे. राखीला पुन्हा लग्न करण्याची इच्छा झाली आहे. या आधी राखीने दोनदा लग्न केले आहे. पण काही कारणांमुळे तिचे दोन्ही नाते तुटले आहेत. पण राखीने इथेच माघार घेतली नाही, तिला पुन्हा एकदा लग्न करायचं आहे आणि यंदा तिचे फर्माइशे काही औरच आहेत. राखीला अगदी काही आठवड्यांपूर्वीच प्रेम झाले होते. पण तिच्या लग्नाच्या मागण्यांमध्ये त्या व्यक्तीचा जराही संदर्भ नाही आणि ना काही संबंध दिसून येत आहे.

Riteish Deshmukh : 'धुरंधर 2'च्या Category मध्ये Raja Shivaji चित्रपटाची एंट्री! सिनेमाची लांबी जाणून व्हाल आवाक्

काय आहेत राखीच्या लग्नाच्या मागण्या?

राखी सावंत म्हणते की, “माझा घटस्फोट झाला आहे. जरी माझा Divorce झाला असला तरी मी माझा धर्म इस्लाम सोडलेला नाही. अजूनही माझं नाव फातिमा आहे. जरी माझा नवरा वाईट निघाला असेल तरी माझा अल्लाह दयाळू आहे. मी इस्लाम धर्माचा पूर्णपणे स्वीकार केला आहे.”तिच्या या वक्तव्यावरून, इस्लाम धर्माविषयी असलेली तिच्या मनातील श्रद्धा पूर्णपणे दिसून येत आहे. तसेच, राखी म्हणते की ती अजूनही तिच्या सासरचे नाव म्हणजेच फातिमा आहे. राखीला पुन्हा एकदा लग्न करायचं आहे आणि यंदा तिला दर्ग्यातील इस्लाम मौलानाशी लग्न करायचे असल्याचे तिचे म्हणणे आहे. ती म्हणते की, “मला एका मौलानाशी लग्न करायचे आहे. माझ्या बहिणीने (सना खान) मुफ्ती अनस यांच्याशी लग्न केले आहे. सना खानचे पती दिवसातून किमान पाच वेळा नमाजाचे पठण करतात. ज्या लोकांना नमाज करणे पसंद आहे ते खूप चांगले आहेत आणि मलाही तसाच जोडीदार हवा आहे.”

350 चित्रपटांचा तगडा अनुभव, BR चोप्रांच्या 'महाभारत' मधून 'शिखंडी'ही गाजला, तरीही म्हणतोय 'मी अ‍ॅक्टर नाही…'

राखी सावंतच्या लग्नाच्या मागण्या आणि इस्लाम धर्मावर असलेलं प्रेम सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. काहीच आठवड्यापूर्वी राखी सावंत बिग बॉसच्या घरातून Evict होऊन बाहेर आली. खेळात राकेश बापटवर तिचा जीव जडला परंतु राकेशकडून तसा काही प्रतिसाद मिळाला नाही. आता राखीचे हे नवं प्रकरण काय आहे? आणि पुढे ती नक्कीच लग्न करणार का? या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra