Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral

रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral

  • पुण्यात अचानक प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्याने रस्त्यावरच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली.
  • स्थानिक महिलांनी तत्परतेने मदत करत सुरक्षित वातावरण तयार केले.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आई होणं काही साधं काम नाही. यासाठी महिलेला प्रचंड वेदनांतून बाहेर पडाव लागतं पण जेव्हा तिच्या हातात आपलं बाळ येतं तेव्हा सर्व सुख जणू तिच्या ओंजळीत येऊन पडल्यासारखं वाटतं. प्रसुतीच्या या कळ कधी आणि कुठे येतील ते सांगता येत नाही. अशात बऱ्याच वेळी इमरजेंन्सीच्या काळात डॉक्टरांच्या मदतीशिवायच महिलेची प्रसूती केली जाते. मागे रेल्वे स्टेशनवर झालेल्या महिलेच्या प्रसूतीची चर्चा जोरदार रंगली होती. अशीच एक घटना यावेळी रस्त्यावर घडून आल्याचे दिसले. ही घटना पुण्यातील एका महिलेसोबत घडली. अचानक कळा आल्या आणि महिलेला या वेदना असहाय्य होऊ लागल्या. मग काय… काही महिलांनी मदतीचा हात पुढे करत साड्यांच्या रिंगणात महिलेची प्रसुती पार पाडली. या घटनेचा व्हिडिओआता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. यातील मुलाचे देखणे रुप आता यूजर्सच्या चेहऱ्यावर चांगलेच हसू आणत आहे. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

वाढदिवसाची नशा की वेडेपणा… ! पेट्रोल ओतलं, रस्त्यावर आग लावून तरुणाने साजरा केला बर्थडे; Video Viral

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, २३ वर्षांची सुप्रिया नितेश काळे गरोदर होती. काही दिवसांपूर्वी ती पुण्याजवळील शिरुर येथील निर्माण चाैकातून जात होत्या. याच वेळी, सुप्रिया काळे यांना अचानक चक्कर येऊ लागली आणि त्यांना प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. त्यांना होत असलेल्या प्रसुतीच्या वेदना आणि बिकट होत असलेली अवस्था पाहून आजूबाजूच्या महिलांनी मदतीसाठी धाव घेतली. जवळून डॉ. सुनीता पोते यांना बोलावण्यात आले. कारण तिची प्रकृती इतकी खालावली होती की तिला रुग्णालयात नेण्यापर्यंत फार उशीर झाला असता. अखेर महिलांना रस्त्यावरच साड्यांनी एक वर्तुळ तयार केलं आणि यात सुप्रयाच्या बाळाला जन्म देण्यात आला. सांगण्यात येत आहे की, त्या दिवशी सुप्रिया प्रसुतीसाठी दाखल झालेल्या रुग्णालयातून परत येत होती. पण तिथे अल्ट्रासाऊंड मशीन काम करत नसल्याने रुग्णालयाने तिला दाखल करण्यास नकार दिला. परिणामी परिस्थिती इतकी बिकट झाली की तिची रस्त्यावरच प्रसूती करावी लागली.

उपचारादरम्यान मुलावर भूताटकीचं सावटं, भिंतीवर चढत करु लागला विचित्र प्रकार, त्या थरार घटनेचा Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @zindagi.gulzar.h नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, "त्यांनी चांगले काम केले आहे, परंतु त्यांनी त्या बाळाला सार्वजनिकरीत्या प्रदर्शित करू नये; हे पूर्णपणे प्रसिद्धीसाठीच आहे", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "आता त्याला आयुष्यभर हे ऐकावं लागेल की त्याला रस्त्यावरुन उचलून आणलंयक" आणखीन एका युजरने लिहिले आहे, "त्या महिला डॉक्टरांचे, तसेच डॉक्टरांना माहिती पुरवणारे कर्मचारी, उपस्थित महिला भगिनी आणि औषध विक्रेते- या संपूर्ण टीमचेही मनःपूर्वक आभार".

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra