Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rate 1 August: LPG सिलेंडर झाला स्वस्त! 1 ऑगस्टला पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Rate 1 August: LPG सिलेंडर झाला स्वस्त! 1 ऑगस्टला पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

  • सिलेंडर झाला स्वस्त!
  • पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही दिलासा?
  • जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
Rate 1 August: ऑगस्ट महिना सामान्यांना थोडा दिलासा घेऊन आला आहे. मागील बरेच महिने महागाईचा झटका सुरु असताना महिन्याचा पहिल्या तारीखला दर थोडे ओसरल्याची चिन्हे दिसत आहेत.
तेल विपणन कंपन्यांनी १ ऑगस्टपासून ( Rate 1 August ) 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत २०० रुपयांपेक्षा अधिक किमतीने कमी केल्या आहेत. दिल्लीत सिलेंडर २०२ रुपयांनी तर कोलकाता शहरात हे दर २०९ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, या दिलासासोबतच सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी झाल्या आहेत का"color: #3366ff;">PM KISAN Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! पीएम किसान योजनेची मुदत वाढवली; वर्षाला मिळणार आता इतके रुपये

व्यावसायिक सिलेंडर का झाला स्वस्त?

तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. यावेळी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि इतर व्यावसायिक घटकांचा विचार करून, १९ किलोच्या सिलेंडरची किंमत २०० रुपयांपेक्षा जास्त कमी करण्यात आली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत मात्र कायम आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किती बदल?

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. पण अद्याप १ ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशभरातील सरकारी तेल कंपन्यांनी जुनेच दर कायम ठेवले आहेत. याचा अर्थ, वाहनचालकांना सध्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही दिलासा मिळालेला नाही.

शहरानुसार पेट्रोलचे दर –

नोएडा – ₹१०१.८९ प्रति लिटर
नवी दिल्ली – ₹१०२.१२ प्रति लिटर
मुंबई – ₹१११.२१ प्रति लिटर
कोलकाता – ₹११३.५१ प्रति लिटर
चेन्नई – ₹१०७.८७ प्रति लिटर
पुणे – ₹११२.०१ प्रति लिटर
आग्रा – ₹१०१.५४ प्रति लिटर
गाझियाबाद – ₹१०२.१२ प्रति लिटर
गुरुग्राम – ₹१०२.९७ प्रति लिटर

शहरानुसार डिझेलचे दर –

नोएडा – ₹९५.३७ प्रति लिटर
नवी दिल्ली – ₹९५.२० प्रति लिटर
मुंबई – ₹९७.८३ प्रति लिटर
कोलकाता – ₹९९.८२ प्रति लिटर
चेन्नई – ₹९९.६५ प्रति लिटर
पाटणा – ₹१००.६१ प्रति लिटर
गुरुग्राम – ₹९५.६४ प्रति लिटर
बंगळूर – ₹९९.५६ प्रति लिटर
चंदीगड – ₹८९.४७ प्रति लिटर

भविष्यात पेट्रोल- डिझेलच्या किमतीमध्ये घट होणार?

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत आहे, परंतु भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणतीही नवीन कपात झालेली नाही. त्यामुळे, वाहन मालकांना सध्या तरी पेट्रोल आणि डिझेल जुन्याच दराने खरेदी करावे लागेल. जर तेल कंपन्यांनी दरात आणखी बदल केले, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये फरक दिसून येईल.

Mumbai Real Estate : मुंबईच्या रिअल इस्टेटचा 14 वर्षांतील विक्रम! जुलै महिन्यात सर्वाधिक 13600 हून अधिक मालमत्तांची नोंदणी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra