Dailyhunt
Ratnagiri News : मुहम्मद सईदचा ऐतिहासिक पराक्रम; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या U-16 कसोटीत रचला विक्रम

Ratnagiri News : मुहम्मद सईदचा ऐतिहासिक पराक्रम; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या U-16 कसोटीत रचला विक्रम

  • मुहम्मद सईदचा ऐतिहासिक पराक्रम;
  • U-16 कसोटीत 10 विकेट
रत्नागिरी : चिपळूणमध्ये जिल्ह्याचा मध्यमगती स्विंग गोलंदाज मुहम्मद सईद शिंग्रे याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या U-16 मल्टीडे इन्व्हिटेशन टूर्नामेंटमध्ये दुर्मिळ विक्रम नोंदवला आहे.
25 एप्रिल 2026 रोजी शासकीय पॉलिटेक्निक मैदानावर रत्नागिरी विरुद्ध ईस्ट झोन सामन्यात सईदने दुसऱ्या डावात सर्व 10 फलंदाज बाद केले. स्विंग गोलंदाजीच्या जोरावर त्याने ईस्ट झोनचा डाव अवघ्या 45 धावांत गुंडाळला. पहिल्या डावात त्याने 4 बळी घेतले होते. त्यामुळे सामन्यात त्याचे एकूण 14 बळी झाले.

मुहम्मद सईदची गोलंदाजी:
– पहिला डाव: 9.4-0-46-4
– दुसरा डाव: 6.5-3-13-10
– सामन्यातील एकूण: 16.3-3-59-14

दुसऱ्या डावात केवळ 6.5 षटकांत 3 निर्धाव टाकत 13 धावांत 10 बळी घेत त्याने फलंदाजांना स्विंगवर नाचवले. रत्नागिरीने 360 व 239 धावा केल्या होत्या. ईस्ट झोन 132 व 45 धावांवर सर्वबाद झाला. रत्नागिरी 422 धावांनी विजयी.एका डावात 10 बळी घेणे ही क्रिकेटमधील सर्वात दुर्मिळ कामगिरी मानली जाते. कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे, जिम लेकर यांनी हा पराक्रम केला आहे. आता रत्नागिरीचा सईद त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी ही अभिमानाची बाब आहे. कोकणच्या या हिऱ्याने इतिहास रचला आहे.

Who is Salil Arora: वडिलांनी घर चालविण्यासाठी सोडले क्रिकेट, मुलगा गाजवतोय मैदान; कोण आहे सलील अरोरा?

संक्षिप्त धावफलक:
– स्पर्धा: MCA U-16 Men's Multiday Test, 2025-26
– स्थळ: शासकीय पॉलिटेक्निक, कोल्हापूर, दि. 25 एप्रिल 2026
– निकाल: रत्नागिरी 422 धावांनी विजयी
– सामनावीर: मुहम्मद सईद शिंग्रे – रत्नागिरी जिल्हा, 4 + 10 = 14 बळी. दुसऱ्या डावात 10 फलंदाजांना मैदान सो़डावं लागलं. मुहम्मद सईद शिंग्रेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याचं राज्यस्तरिय पातळीवर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra