Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रात्रीच्या वेळी अचानक जाग येते? लिव्हरसबंधित गंभीर आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे, जाणून घ्या घरगुती उपाय

रात्रीच्या वेळी अचानक जाग येते? लिव्हरसबंधित गंभीर आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे, जाणून घ्या घरगुती उपाय

लिव्हरचे आरोग्य बिघडण्याची कारणे? रात्रीच्या वेळी अचानक जाग का येते?
शांत झोपेसाठी कोणते उपाय करावेत?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, बिघडलेले मानसिक आरोग्य, जेवणाच्या चुकीच्या वेळा इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावरलगेच दिसून येतो.

त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी लवकर झोप येत नाही आणि झोप आल्यानंतर सुद्धा अचानक २ ते ३ च्या दरम्यान जाग येते. या समस्येकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पण असे न करता शरीरसंबंधित दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. लिव्हर शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. रक्त शुद्ध करणे, शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे, पित्त तयार करणे इत्यादी ५० पेक्षा जास्त कामे लिव्हर करते. पण लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात.(फोटो सौजन्य - istock)

पांढऱ्या भातातून शरीराला मिळेल विटामिन B-12! उन्हाळ्यात पारंपरिक पद्धतीने बनवा 'हा' चविष्ट पदार्थ, पचनक्रिया राहील मजबूत

फॅटी लिव्हर, लिव्हर कॅन्सर, लिव्हर सोरायसिस इत्यादी आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. तसेच रात्रीच्या वेळी केवळ लिव्हरच्या आजारांमुळे नाहीतर इतर समस्यांमुळे सुद्धा उद्भवू शकतो. वैद्यकशास्त्रानुसार, २ ते ३ च्या मध्ये फुफ्फुसांच्या दुरुस्तीशी संबंधित वेळ मानली जाते. रक्तातील साखर कमी होणे, हार्मोन्समधील बदल किंवा लिव्हरवरील ताण इत्यादी कारणांमुळे सुद्धा झोप बिघडण्याची शक्यता असते. झोपेतून अचानक जाग आल्यानंतर खोकला, श्वास घेण्यास त्रास, बेचैनी किंवा सतत एकाच वेळेला जाग येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया रात्रीच्या वेळी अचानक जाग येण्याची कारणे, याबद्दल सविस्तर माहिती.

फुफ्फुसांचे आरोग्य:

फुफ्फुसांचे आरोग्य बिघडल्यानंतर सुद्धा रात्रीच्या वेळी अचानक जाग येते. हा वेळ फुफ्फुसांच्या दुरुस्तीसाठी असतो. तसेच झोपेतून उठल्यानंतर खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. कारण फुफ्फुसांमध्ये कफ साचून राहिल्यामुळे विषारी घटक वाढतात आणि आरोग्य बिघडतात. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर सुद्धा फुफ्फुसांसंबधित लक्षणे दिसू लागतात.

रक्तातील साखरेची पातळी कमी होणे:

मध्यरात्रीच्या वेळी अचानक शरीरातील साखरेची पातळी कमी होण्याची जास्त शक्यता असते. ज्यावेळी शरीरातील साखर खूप जास्त कमी होऊन जाते तेव्हा शरीर संरक्षणासाठी कॉर्टिसोल आणि ॲड्रवरनालिन हार्मोन्स स्रवते. हे हार्मोन्स पुन्हा एकदा शरीरात साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत करतात. तसेच लिव्हरच्या आरोग्यावर जास्तीचा तणाव निर्माण झाल्यास पहाटे ५ वाजता त्याची लक्षणे दिसू लागतात.

१० दिवस चहा कॉफी पिणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात दिसून येतील 'हे' बदल, सुधारेल झोपेची गुणवत्ता

लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाय:

शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ नये म्हणून जाग आल्यानंतर एका जागेवर शांत बसून ५-१० वेळा ‘ओम’ चा उच्चार किंवा भ्रामरी प्राणायाम करा. यामुळे मज्जासंस्था पुन्हा एकदा शांत झोप घेण्यास सक्रिय होते. रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून प्यावी. यामुळे लिव्हर स्वच्छ होण्यास मदत होते आणि विषारी घटक बाहेर पडून जातात. रात्री ९ नंतर मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करणे टाळावे. रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये ३ तासांपेक्षा जास्त अंतर असावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होण्यास मदत होते.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra