Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?

  • ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार
  • भुवीला मोठा झटका
  • कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?
इंडियन प्रीमियर लीग 2026 आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष केवळ ट्रॉफीकडेच नाही, तर ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीकडेही लागले आहे.
यंदाच्या हंगामात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, पण फलंदाजी आणि गोलंदाजीतील सर्वोत्तम खेळाडू ठरण्यासाठी आता अंतिम सामन्यात निर्णायक लढत पाहायला मिळणार आहे. अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार असून या सामन्यानंतरचऑरेंज-पर्पल कॅप पुरस्कारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Vaibhav Sooryavanshi: 'IPL गाजवलं, आता टीम इंडियासाठी पूर्णपणे सज्ज', वैभव सूर्यवंशीबद्दल कुमार संगकाराचे मोठे विधान

गिल अन् साई सुदर्शनमध्ये स्पर्धा

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गुजरात टायटन्सचे कर्णधार शुभमन गिल आणि युवा फलंदाज साई सुदर्शन यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. दोन्ही खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिले. शुभमन गिलने आपल्या आक्रमक शैलीत मोठ्या धावा केल्या, तर साई सुदर्शनने शांत आणि संयमी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. अंतिम सामन्यात कोण मोठी खेळी करतो, यावर ऑरेंज कॅपचा निकाल अवलंबून असणार आहे.

आयपीएल २०२६ ऑरेंज कॅप लीडरबोर्ड (टॉप ५)

  • वैभव सूर्यवंशी (RR) – ७७६ धावा
  • शुभमन गिल (GT) – ७२२ धावा
  • साई सुदर्शन (GT) – ७१० धावा
  • हेनरिक क्लासेन (SRH) – ६२४ धावा
  • इशान किशन (SRH) – ६०२ धावा

भुवनेश्वरने गमावली ऑरेंज कॅप

दुसरीकडे, पर्पल कॅपच्या शर्यतीतही मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत आरसीबीचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आघाडीवर होता. मात्र क्वालिफायर २ नंतर मात्र गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने क्वालिफायर सामन्यात शानदार गोलंदाजी करत त्याला मागे टाकले. रबाडाने महत्त्वाच्या क्षणी विकेट्स घेत संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोठे योगदान दिले. भुवनेश्वर कुमारने यंदाच्या हंगामात अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केली असून त्याचा इकॉनॉमी रेटही चांगला राहिला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात तो पुन्हा पर्पल कॅप मिळवतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आयपीएल २०२६ पर्पल कॅप लीडरबोर्ड (टॉप ५)

  • कागिसो रबाडा (GT) – २८
  • भुवनेश्वर कुमार (RCB) – २६
  • जोफ्रा आर्चर (RR) – २५
  • अंशुल कंबोज (CSK) – २१
  • इशान मलिंगा (SRH) – २०
IPL 2026 चा अंतिम सामना केवळ ट्रॉफीसाठीच नव्हे, तर वैयक्तिक पुरस्कारांच्या निर्णायक लढतीसाठीही खास ठरणार आहे. ऑरेंज कॅप कोण जिंकणार आणि पर्पल कॅप कोणाच्या डोक्यावर राहणार, याचा फैसला आता अंतिम सामन्यात होणार आहे.

Asian Game: विनेश फोगाट आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी दाखल; 53 किलो वजनी गटात स्पर्धा; IG स्टेडियमला छावणीचे स्वरूप

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra