- अमेरिकन चाॅप्सी हा एक लोकप्रिय इंडो चायनिजचा प्रकार आहे.
- चायनीज फूड लव्हर्स असाल ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल.
- खास प्रसंगी तुम्ही ही रेसिपी घरी बनवू शकता.
Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार 'ब्रेड पकोडा'
कुरकुरीत नूडल्स, मऊ शिजलेल्या भाज्या आणि घट्ट, चविष्ट सॉस यांचा प्रत्येक घास वेगळी चव अनुभवायला लावतो. वाढदिवस, संध्याकाळचा नाश्ता किंवा विकेंड स्पेशल मेनूसाठी हा पदार्थ उत्तम पर्याय ठरतो. आपल्या आवडीनुसार त्यात पनीर, मशरूम, चिकन किंवा प्रॉन्सदेखील घालता येते. चला रेसिपीजाणून घेऊया.
साहित्य
- २०० ग्रॅम हक्का नूडल्स
- २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
- तळण्यासाठी तेल
- १ कप कोबी (बारीक चिरलेला)
- १ गाजर (लांब कापलेले)
- १ सिमला मिरची (बारीक चिरलेली)
- १ कांदा (पातळ कापलेला)
- १/४ कप फरसबी (चिरलेली)
- १ टेबलस्पून लसूण (बारीक चिरलेला)
- १ टीस्पून आले (बारीक चिरलेले)
- २ टेबलस्पून टोमॅटो केचप
- १ टेबलस्पून चिली सॉस
- १ टीस्पून सोया सॉस
- १ टीस्पून व्हिनेगर
- १ टेबलस्पून साखर
- चवीनुसार मीठ
- १/२ टीस्पून काळी मिरी पूड
- १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर (पाण्यात मिसळून)
- २ कप पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक
- वरून सजावटीसाठी स्प्रिंग ऑनियन
- इच्छेनुसार तळलेले अंडे
कृती
- नूडल्स पॅकेटवरील सूचनांप्रमाणे उकळून घ्या. त्यातील पाणी पूर्णपणे काढून त्यात २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर हलकेच मिसळा.
- कढईत तेल गरम करून नूडल्सचे छोटे भाग करून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. अतिरिक्त तेल निघण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवा.
- दुसऱ्या पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात लसूण आणि आले परतून घ्या.
- त्यानंतर कांदा, गाजर, फरसबी, कोबी आणि सिमला मिरची घालून मोठ्या आचेवर २ ते ३ मिनिटे परता. भाज्या किंचित कुरकुरीत राहू द्या.
- आता त्यात टोमॅटो केचप, चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, साखर, मीठ आणि काळी मिरी पूड घालून चांगले मिसळा.
त्यात पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक घालून मिश्रणाला उकळी आणा. नंतर कॉर्नफ्लोअरचे पाण्यातील मिश्रण घालून सॉस हलवत राहा. सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा. - सर्व्हिंग प्लेटमध्ये कुरकुरीत तळलेले नूडल्स ठेवा. त्यावर गरमागरम भाज्यांचा सॉस समान पसरवा. इच्छेनुसार वर तळलेले अंडे ठेवा.
- शेवटी स्प्रिंग ऑनियनने सजावट करून लगेच गरमागरम सर्व्ह करा.

