Dailyhunt
Recipe : लहान मुलं करतायेत आईस्क्रिम खाण्याचा हट्ट, मग घरीच बनवा नो शुगर "ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम"

Recipe : लहान मुलं करतायेत आईस्क्रिम खाण्याचा हट्ट, मग घरीच बनवा नो शुगर "ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम"

  • उन्हाळ्यात आईस्क्रिम खाण्याची फार इच्छा होते.
  • पण याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरत नाही.
  • मुलांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही घरीच आरोग्यदायी आईस्क्रिम तयार करु शकता.
लहान मुलांना गोड खाण्याची आवड असते, हे अगदी नैसर्गिक आहे.
पण बाजारात मिळणाऱ्या गोड पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात साखर, कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्ह्ज असतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे पालक म्हणून आपण नेहमीच विचार करतो की मुलांच्या चवीला आवडेल आणि त्याचवेळी त्यांच्या शरीरालाही पोषण देईल असा पर्याय काय असू शकतो. अशा वेळी घरच्या घरी बनवलेली, साखर न घातलेली ड्रायफ्रूट आईस्क्रीम हा एक उत्तम आणि स्मार्ट पर्याय ठरतो.

पिकलेल्या आंब्यापासून बनवा चविष्ट लाडू, फक्त 3 साहित्यांची गरज लागेल; शेफ कुणाल यांनी शेअर केली रेसिपी

ही आईस्क्रीम केवळ चविष्टच नाही, तर त्यामध्ये वापरलेले सुकेमेवे, दूध आणि नैसर्गिक गोडी देणारे खजूर व अंजीर यामुळे ती पोषणमूल्यांनी भरलेली असते. मुलांना आवडणारी चॉकलेटी फ्लेवर आणि क्रीमी टेक्स्चर असल्यामुळे ते आनंदाने खातात, आणि तुम्हालाही त्यांच्या आरोग्याची चिंता राहत नाही. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि त्यासाठी फारशा अवघड साहित्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया ही पौष्टिक आणि स्वादिष्ट ड्रायफ्रूट आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य

  • एक कप मखाणे
  • दीड कप दूध
  • अर्धा कप काजू आणि बदाम
  • एक कप अंजीर आणि खजूर
  • तीन चमचे कोको पावडर
  • एक डार्क चॉकलेट
सतत बटाटे खाऊन कंटाळा आला असेल तर डब्यासाठी बनवा टेस्टी रताळ्याची भाजी, झटपट तयार होईल पदार्थ

कृती

  • सर्वप्रथम मखाणे हलक्या आचेवर कोरडे भाजून घ्या. यामुळे त्यांचा कुरकुरीतपणा आणि चव अधिक छान लागते.
  • आता काजू आणि बदाम देखील थोडेसे भाजून घ्या आणि थंड होऊ द्या. अंजीर आणि खजूर लहान तुकड्यांमध्ये कापून ठेवा.
  • मिक्सरमध्ये भाजलेले मखाणे, काजू, बदाम, अंजीर आणि खजूर घालून एकदम मऊसर पेस्ट तयार करा.
  • एका भांड्यात दूध गरम करा. त्यात हळूहळू कोको पावडर घाला आणि गुठळ्या होऊ नयेत म्हणून नीट ढवळा.
  • आता या दुधात तयार केलेला ड्रायफ्रूट पेस्ट घाला आणि मंद आचेवर थोडा वेळ शिजवा.
  • दरम्यान डार्क चॉकलेट वितळवून त्यात मिसळा आणि सगळे मिश्रण एकजीव करा.
  • तयार झालेले मिश्रण एका एअरटाइट डब्यात काढा आणि ४-५ तासांसाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • आईस्क्रीम घट्ट झाल्यावर बाहेर काढून सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रूटचे तुकडे घालून सजवा.
  • घरच्या घरी बनवलेली ही साखरविरहित ड्रायफ्रूट आईस्क्रीम मुलांसाठी आरोग्यदायी आणि चविष्ट असा उत्तम पर्याय ठरते.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra