- सोशल मीडियावर एका महिलेचा धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिची कृती पाहून अनेकांचा श्वास रोखला आहे.
- काही सेकंदांच्या व्हिडिओत तिने जीव धोक्यात घालणारा प्रकार केल्याचे दिसत असून नेटकऱ्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
- व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी अशा स्टंटपासून दूर राहण्याचे आवाहन करत प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळू नये, असे मत व्यक्त केले.
काय दिसलं व्हिडिओत?
एका व्हायरल व्हिडिओमध्ये, एक महिला धावत्या ट्रेनच्या दारात उभी राहून एक धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. पांढऱ्या रंगाची साडी नेसून, तिने दाराचे दोन्ही हँडल घट्ट पकडले आहेत. अर्धे शरीर रेल्वेच्या आत तर अर्धे बाहेर या पोझीशनमध्ये ती लटकत असतानाचा जोरदार ठुमके देखील मारुन दाखवते. महिलेचा हा प्रकार पाहून जवळ उभा असलेला माणूस देखील थक्क होतो. महिलेचा जराही तोल ढासळला असता किंवा हात निसटला असता तर तिचा जीव जाण्याची शक्यता होती. पण सुदैवाने व्हिडिओत असे काहीही घडले नाही. काही सेकंदाच्या या व्हिडिओने अनेकांचा श्वास रोखून धरला पण महिलेने मोठ्या शिताफीने हा पराक्रम करुन दाखवला. या व्हिडिओला सध्या इंटरनेटवर चांगले व्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी महिलेच्या कृतीवर आपला संताप व्यक्त केला आहे.
Diamond Flower: आयुष्यात फक्त एकदाच फुलतं हे दुर्मिळ फूल; हिमालयात दडलंय निसर्गाचं अद्भुत रहस्य
हा व्हिडिओ @jamir1919 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, "धावत्या ट्रेनच्या दारातून बाहेर लटकणे काही क्षणांसाठी रोमांचक वाटू शकते, पण एका छोट्या चुकीमुळे आयुष्यभराचा पश्चात्ताप होऊ शकतो. असे स्टंट नेहमी टाळा आणि इतरांनाही त्याबद्दल जागरूक करा", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "एका लहान चुकीमुळे तिचा जीव जाऊ शकतो", आणखी एका यूजरने लिहिले आहे, "व्हायरल होण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालायला मागेपुढे पाहत नाहीत. या बाईकडे बघा, तिची थोडी जरी चूक झाली, तर ती थेट यमराजाला भेटेल".
टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

