- RB Group D प्रवेशपत्र आजपासून टप्प्याटप्प्याने जारी होण्याची शक्यता
- ग्रुप डीची CBT परीक्षा 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार
- सर्व उमेदवारांचे हॉल तिकीट एकाच दिवशी उपलब्ध होणार नाही.
- परीक्षेच्या तारखेनुसार प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड
रेल्वे भरती मंडळ दरवेळी परीक्षेच्या काही दिवस आधी प्रवेशपत्र उपलब्ध करून देते. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचे प्रवेशपत्र एकाच दिवशी प्रसिद्ध होणार नाही. ज्या उमेदवारांची परीक्षा पुढील तारखांना आहे, त्यांना त्यांच्या परीक्षेच्या जवळच्या कालावधीत प्रवेशपत्र मिळेल.
सर्वात मोठ्या भरतींपैकी एक
यंदाची ग्रुप डी भरती ही रेल्वेच्या मोठ्या भरतींपैकी एक मानली जात आहे. देशभरातून जवळपास 87 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरतीद्वारे लेव्हल-1 मधील 22 हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धा मोठी असून या परीत्रेमधील प्रत्येक गुण महत्त्वाचा ठरणार आहे.
परदेशातून MBBS केल्यानंतर FMGE पास होण्यासाठी किती वर्षे लागतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती
प्रवेशपत्र कधी मिळणार?
रेल्वेकडून प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्याची निश्चित वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी दिवसभर अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देत अपडेट तपासणे आवश्यक आहे. वेबसाइटवर प्रवेशपत्राची लिंक सक्रिय होताच ती डाउनलोड करता येईल.
प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल?
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर ग्रुप डी भरतीशी संबंधित हॉल तिकीट किंवा ई-कॉल लेटरची लिंक निवडा.
- यानंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- आवश्यक असल्यास स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा भरावा.
- सर्व माहिती भरल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
- ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे.
ऑगस्टच्या ‘या’ तारखेपासून CBT परीक्षा
ग्रुप डीची संगणक आधारित परीक्षा 3 ऑगस्टपासून देशभरातील 200 हून अधिक परीक्षा केंद्रांवर सुरू होणार आहे. परीक्षा दररोज तीन सत्रांमध्ये घेतली जाणार असल्याने प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रवेशपत्रावरील शिफ्ट, रिपोर्टिंग वेळ आणि परीक्षा केंद्राचा पत्ता नीट तपासावा. परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचणे महत्त्वाचे आहे. उशिरा पोहोचल्यास प्रवेश मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवणे योग्य ठरेल.प्रवेशपत्रावरील माहिती तपासा
प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यावरील नाव, फोटो, परीक्षा दिनांक, वेळ, केंद्राचा पत्ता आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासा. कोणतीही चूक आढळल्यास तातडीने संबंधित रेल्वे भरती मंडळाशी संपर्क साधावा. परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्रासोबत वैध फोटो ओळखपत्र नेणेही आवश्यक असते. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे एक दिवस आधीच तयार ठेवावीत.
शेवटच्या टप्प्यात तयारीवर भर द्या
आता परीक्षा अगदी जवळ आल्याने नवीन विषय शिकण्यापेक्षा आधी केलेल्या अभ्यासाची उजळणी करणे अधिक फायदेशीर ठरेल. मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करा, वेळेचे नियोजन सांभाळा आणि आत्मविश्वास कायम ठेवा.
ज्या उमेदवारांची परीक्षा 3 ऑगस्ट रोजी आहे, त्यांनी प्रवेशपत्रासाठी अधिकृत वेबसाइटवर नियमित लक्ष ठेवावे. इतर उमेदवारांनीही घाई न करता आपल्या परीक्षेच्या तारखेच्या आधी हॉल तिकीट उपलब्ध होईल, याची नोंद घ्यावी. योग्य तयारी, वेळेवर उपस्थिती आणि शांत मन या तीन गोष्टी यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या ठरतील.

