Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
RTO Challan च्या नावाखाली सायबर जाळे; APK फाईल उघडताच खात्यातून 7.63 लाख लंपास

RTO Challan च्या नावाखाली सायबर जाळे; APK फाईल उघडताच खात्यातून 7.63 लाख लंपास

  • सातारामध्ये धक्कादायक सायबर फसवणूक
  • बनावट APK फाईलमुळे ज्येष्ठ नागरिक गमावले लाखो रुपये
  • APK फाईल उघडताच खात्यातून 7.63 लाख लंपास
कोरेगाव : सातारा जिल्ह्यातील बनवडी (ता. कोरेगाव) येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक सर्जेराव व्यंकट नलगे यांची WhatsApp वर आलेल्या बनावट ‘ RTO Challan’ नावाच्या APK फाईलमुळे 7 लाख 63 हजार 600 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

WhatsApp वर आली APK फाईल

वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी सर्जेराव नलगे हे घरी असताना त्यांच्या WhatsApp वर परदेशी क्रमांकावरून ‘RTO Challan’ नावाची APK फाईल आली. ती अधिकृत संदेश असल्याचे समजून त्यांनी फाईल उघडली. फाईल उघडताच त्यांच्या मोबाईलची स्क्रीन अचानक काळी पडली.

Pune Crime : अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

दुसऱ्याच दिवशी बँकेचा फोन

दुसऱ्या दिवशी HDFC बँकेकडून नलगे यांना फोन आला. त्यांच्या खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याची माहिती बँकेने दिली. नलगे यांनी असे कोणतेही व्यवहार केले नसल्याचे सांगितल्यानंतर खात्याचे स्टेटमेंट तपासण्यात आले.

खात्यातून 7.63 लाख रुपये गायब

तपासात त्यांच्या खात्यातून खालीलप्रमाणे व्यवहार झाल्याचे समोर आले:

1 लाख 96 हजार 200 रुपयांचे तीन व्यवहार

1 लाख रुपयांचा एक व्यवहार

75 हजार रुपयांचा एक व्यवहार

अशाप्रकारे एकूण 7 लाख 63 हजार 600 रुपये त्यांच्या खात्यातून परस्पर काढण्यात आले.

APK फाईलमुळे मोबाईल हॅक झाल्याचा संशय

नलगे यांच्या लक्षात आले की, WhatsApp वर आलेली APK फाईल उघडल्यानंतरच ही फसवणूक झाली. त्यानंतर त्यांनी वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर करत आहेत.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

  • या घटनेच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
  • अनोळखी क्रमांकावरून आलेल्या APK फाईल कधीही उघडू नका.
  • संशयास्पद लिंक किंवा अॅप डाउनलोड करण्यास सांगणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नका.
  • कोणतीही वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर करू नका.
  • अशा प्रकारचे संदेश आल्यास ते त्वरित डिलीट करा.
  • आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 सायबर हेल्पलाइन किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा.
सायबर तज्ज्ञांच्या मते, APK फाईलद्वारे मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल करून बँकिंग अॅप, OTP, स्क्रीन आणि इतर संवेदनशील माहितीवर नियंत्रण मिळवले जाते. त्यामुळे अशा फाईल्सपासून विशेष सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीत जाऊन बेड्या; इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर कारवाई

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra