Dailyhunt
सल्या अडकला लग्नबंधनात; सैराट फेम अरबाज शेखचा निकाह, फोटोंवर कमेंट करत रिंकु राजगुरु म्हणाली..

सल्या अडकला लग्नबंधनात; सैराट फेम अरबाज शेखचा निकाह, फोटोंवर कमेंट करत रिंकु राजगुरु म्हणाली..

  • सल्या अडकला लग्नबंधनात;
  • सैराट फेम अरबाज शेखचा निकाह,
  • फोटोंवर कमेंट करत रिंकु राजगुरु म्हणाली….
Sairat fame Arbaj Shaikh married to Simran: असा एक मराठी सिनेमा ज्याने भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला डंका गाजवला तो सिनेमा म्हणजे सैराट.
या सिनेमात कोणताही असा कलाकार नव्हता त्याने आधी अभिनय क्षेत्रात काम केलं. मात्र या सिनेमानंतर फक्त आर्ची आणि परशाच नाही तर सल्या आणि बाळ्या यांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. मैत्री असावी तर परशा, सल्या आणि बाळ्यासारखी असं म्हटलं जातं. या सिनेमातला सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख हा नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. अरबाजने त्याची मैत्रीण सिमरन हिच्याशी निकाह केला आहे.

लग्नाचे फोटो अरबाजने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नसोहळ्यात दोधांनी देखील सोनेरी रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले होते. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अरबाजने Just Us असं कॅप्शन दिलं. अरबाजच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी देखील अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मात्र या सगळ्यात आर्चीची म्हणजे अभिनेत्री रिंकु राजगुरु ही कमेंट चर्चेत आली आहे. रिंकुने अरबाजच्या फोटोंवर रेड हार्टची इमोजी पोस्ट केली.

सैराट सिनेमातील सल्या या व्यक्तीरेखेने अरबाजला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. त्यानंतर यारी, संघर्ष योद्धा जरांगे पाटील, मुसंडी, घर बंदूक बिरयानी, झुंड, एकदम कडक अशा अनेक चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या. इतकंच नाही तर प्राइम व्हिडीओवर अलीकडेच आलेल्या 'मटका किंग' या विजय वर्माच्या सीरिजमध्येही अरबाज झळकला. अरबाज अभिनया व्यतिरिक्त देखील एक उत्तम व्यावसायिक देखील आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट जवळ 'बेक बडीज' या नावाने केक आणि कॅफे सुरू केला होता.

मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा नवा सिनेमा; 'आई तारी तिला कोण मारी','मर्दिनी' सिनेमाच्या पोस्टरची पहिली झलक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra