- Galaxy Z Fold8 Ultra, Fold8 आणि Flip8 ला 72 तासांत 2.71 लाखांहून अधिक प्री-ऑर्डर्स मिळाल्या.
- 22 जुलै रोजी भारतात लॉन्च झाल्यानंतर प्री-ऑर्डरचा नवा विक्रम
- गेल्या वर्षीच्या Galaxy Z Fold7 आणि Flip7 पेक्षा यंदा प्री-ऑर्डर्सचा वेग
- भारतात फोल्डेबल स्मार्टफोनची लोकप्रियता आणि ग्राहकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात
Galaxy Z Fold8 Ultra: सॅमसंगचे ८ व्या जनरेशनचे फोल्डेबल स्मार्टफोन्स गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ यांनी प्री-ऑर्डरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, ज्यामुळे फोल्डेबल तंत्रज्ञानाचा मुख्य प्रवाहात आलेला वापर आणि भारतातील अभूतपूर्व ग्राहक उत्साह अधोरेखित होतो.
भारतात २२ जुलै रोजी लॉंच झाल्यानंतर अवघ्या ७२ तासांच्या आत या नवीन डिवाईसेससाठी २,७१,००० हून अधिक प्री-ऑर्डर्सची नोंद झाली. गेल्या वर्षी, सॅमसंग इंडियाला आपल्या गॅलेक्सी झेड फोल्ड७ आणि झेड फ्लिप७ साठी अशीच प्री-ऑर्डर संख्या मिळवण्यासाठी १५ दिवस लागले होते. (Samsung)
उल्लेखनीय यश
गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे, ज्यामध्ये ४५ टक्के प्री-ऑर्डर्स या टियर २ आणि त्यापुढील शहरांमधून आल्या आहेत. यामधून या क्षेत्रांमध्ये फोल्डेबल डिवाईसेसची वाढती मागणी अधोरेखित होते, ज्यामुळे त्यांना व्यापक वाढीची क्षमता असलेले एक नवीन केंद्र म्हणून स्थापित केले गेले आहे.ही वाढ केवळ फोल्डेबल स्मार्टफोन्सचे व्यापक आकर्षण दर्शवत नाही, तर ग्राहकांचे बदलणारे चित्र देखील दर्शवते, जिथे नाविन्यता आता केवळ महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही.
फोल्डेबल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर
या अभूतपूर्व यशाचा विचार करता, सॅमसंगला या वर्षाच्या सुरुवातीला लॉंच केलेल्या एस२६ सिरीजसाठी मिळालेल्या प्री-ऑर्डर्सची बरोबरी करण्याचा आत्मविश्वास आहे, ज्यामधून फोल्डेबल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार झाल्याचे दिसून येते.
वैयक्तिकीकृत गॅलेक्सी एआय अनुभव
"आमच्या नवीन गॅलेक्सी झेड सिरीजला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, उत्पादकता वाढवणाऱ्या आणि सर्जनशील क्षमता सादर करणाऱ्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी भारतातील वाढती मागणी दर्शवतो. वैयक्तिकीकृत गॅलेक्सी एआय अनुभव देणारी ही डिवाईसेस केवळ मेड इन इंडियाच नाहीत, तर भारतातील ग्राहकांच्या गतिमान गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या आमच्या प्रबळ भारतीय संशोधन आणि विकास क्षमतांद्वारे त्यांना पाठबळ दिले गेले आहे.
टियर २ आणि त्यापुढील शहरांमधून ४५ टक्के प्री-ऑर्डर्स आल्याने, आम्ही महत्त्वपूर्ण क्षमता असलेल्या एका आशादायक वाढत्या बाजारपेठेचा उदय पाहत आहोत," असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे प्रेसिडंट आणि सीईओ जेबी पार्क म्हणाले.

