Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सनफीस्ट डार्क फँटसीचा नवा उपक्रम! ग्राहकांसाठी शाहरुख खानसोबतचा खास अनुभव देत 'हर दिल की फँटसी' साकारली

सनफीस्ट डार्क फँटसीचा नवा उपक्रम! ग्राहकांसाठी शाहरुख खानसोबतचा खास अनुभव देत 'हर दिल की फँटसी' साकारली

  • आयुष्यभर स्मरणात राहतील असे क्षण अनुभवण्याची संधी मिळाली.
  • शाहरुख खान यांच्यासोबतची प्रत्यक्ष भेट हा या मोहिमेतील सर्वात खास आणि बहुप्रतीक्षित अनुभव ठरला.
  • आकांक्षा अविस्मरणीय अनुभवांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आयटीसीच्या सनफीस्ट डार्क फँटसीने आपल्या ‘हर दिल की फँटसी’ या मोहिमेअंतर्गत देशभरातील 40 भाग्यवान ग्राहकांना बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची अविस्मरणीय संधी दिली. ‘1 मिलियन फँटसीज’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या खास कार्यक्रमात विजेत्यांना शाहरुखसोबत संवाद साधण्याची, छायाचित्रे काढण्याची आणि आयुष्यभर स्मरणात राहतील असे क्षण अनुभवण्याची संधी मिळाली.

बॉस बदलले, पद्धती बदलल्या! भारतातील बड्या कंपन्यांच्या उच्च पदांवर मिलिनियल्सची हवा; पाहा काय सांगतोय LinkedIn चा डेटा

या उपक्रमाद्वारे आतापर्यंत 10 लाखांहून अधिक ग्राहकांना विविध आकर्षक बक्षिसे आणि खास अनुभव देण्यात आले आहेत. यामध्ये एसयूव्ही, युरोप आणि थायलंड सहली, क्रूझर बाइक्ससह अनेक बक्षिसांचा समावेश आहे. मात्र, शाहरुख खान यांच्यासोबतची प्रत्यक्ष भेट हा या मोहिमेतील सर्वात खास आणि बहुप्रतीक्षित अनुभव ठरला.

2023 मध्ये सुरू झालेल्या ‘हर दिल की फँटसी’ या प्लॅटफॉर्मचा उद्देश प्रत्येक व्यक्तीच्या छोट्या-मोठ्या स्वप्नांना वास्तवात उतरवणे हा आहे. या मोहिमेद्वारे दैनंदिन आयुष्यातील इच्छा आणि आकांक्षा अविस्मरणीय अनुभवांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Share Market मध्ये थरथराट… डोनाल्ड ट्रम्प यांचा इशाऱ्याने मोठा फटका, सेन्सेक्स 1900 अंकांनी धडाम तर निफ्टीचे हाल बेहाल

या उपक्रमाबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाले, “फँटसी प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणा आणि आशा निर्माण करते. चाहत्यांसाठी असे खास क्षण निर्माण करण्याचा भाग होणे माझ्यासाठीही आनंददायी आहे. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी आपले स्वप्न पूर्ण झाल्याचा अनुभव मिळायला हवा.” सनफीस्टचे मार्केटिंग प्रमुख सूरज काथुरिया यांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश केवळ बक्षिसे देणे नसून ग्राहकांना आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव देणे हा आहे. तामिळनाडूतील 23 वर्षीय विजेता किशोर गणेशननेही शाहरुखला प्रत्यक्ष भेटण्याचे आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त करत, हा अनुभव आयुष्यभर जपून ठेवणार असल्याचे सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra