- अंगारकी संकष्टी चतुर्थी कधी आहे
- अंगारकी संकष्टी चतुर्थी उपाय
- संकष्टी चतुर्थीला या मंत्रांचा करा जप
शास्त्रानुसार गणपतीला पूजले जाणारे पहिले दैवत मानले जाते. चतुर्थी तिथी हा गणपतीच्या पूजेसाठी एक विशेष दिवस मानला जातो.
पंचांगानुसार, संकष्टी चतुर्थीकृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. द्रिक पंचांगानुसार, ५ मे रोजी एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी गणपतीच्या एकदंत रूपाची विशेष पूजा केली जाईल आणि पूर्ण दिवस भक्त उपवास करतात. पौराणिक कथेनुसार, मदसुर राक्षसाचा वध करण्यासाठी गणपती एकदंत रूपात प्रकट झाले होते. असे मानले जाते की एकदंत चतुर्थीला योग्य विधींनी गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे त्रास आणि दुःखे दूर होतात आणि गणपतीचा विशेष आशीर्वाद मिळतो. मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी कोणते उपाय केल्याने जीवनात सकारात्मकता येते जाणून घ्या
संकष्टी चतुर्थी मुहूर्त
वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवार, 5 मे रोजी सकाळी ५:२४ वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती ६ मे रोजी सकाळी ७:५१ वाजता होईल. उद्यतिथीनुसार संकष्टी चतुर्थी मंगळवार, 5 मे रोजी आहे. यावेळी चंद्रोद्य रात्री 10.19 वाजता आहे.
Sankashti Chaturthi 2026: एकदंत संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
या गोष्टींचा दाखवा नैवेद्य
शास्त्रानुसार, गणपतीला मोदक खूप आवडतात. त्यांना गूळ, नारळ आणि तीळ वापरून बनवलेले पदार्थही खायला आवडतात. गणेश चतुर्थीला गणपतीला बेसनाचे लाडूही अर्पण करू शकता.
हा रंग आहे प्रिय
संकष्टी चतुर्थीला लाल किंवा पिवळे कपडे परिधान करावेत. कारण असे मानले जाते की हे रंग गणपतीला अत्यंत प्रिय आहेत. याव्यतिरिक्त, आपण या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे देखील घालू शकता, कारण बुद्धी देणारे गणपती हा रंग त्यांना खूप प्रिय मानला जातो.
आर्थिक लाभासाठी करा हे उपाय
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री विड्याच्या पानावर गूळ आणि कुंकू ठेवा. त्यानंतर, ते गणपतीला अर्पण करा. तसेच, एक चांदीचे किंवा तांब्याचे नाणे लाल कापडात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की संकष्टी चतुर्थीला असे केल्याने आर्थिक समृद्धी येते.
Dream Meaning: स्वप्नात स्वतःला पडताना पाहण्याचा अर्थ, काय सांगते स्वप्नशास्त्र
या मंत्रांचा करा जप
ॐ गं गणपतये नमः
ॐ वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा,
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा
ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुद्धि प्रचोदयात
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

