Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सस्पेन्स, थरार अन् रहस्याचा संगम! 'राव बहादुर'चा ट्रेलर चर्चेत,सत्यदेवच्या शाही लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

सस्पेन्स, थरार अन् रहस्याचा संगम! 'राव बहादुर'चा ट्रेलर चर्चेत,सत्यदेवच्या शाही लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

भिनेता सत्यदेव प्रमुख भूमिकेत असलेला दिग्दर्शक व्यंकटेश महा यांचा आगामी मानसशास्त्रीय थरारपट 'राव बहादुर' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले असून, चित्रपट ३ जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

यासोबतच चित्रपटाचा दमदार ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

निर्मिती संस्था श्री चक्र एंटरटेनमेंट्सने सोशल मीडियावर चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती दिली. तसेच चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. ट्रेलरमध्ये रहस्य, सस्पेन्स आणि मानसशास्त्रीय थरार यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

यापूर्वी निर्मात्यांनी 'Into the World of Rao Bahadur' हा पडद्यामागील खास व्हिडिओ प्रदर्शित केला होता. या व्हिडिओत चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेची झलक, भव्य सेट्स, प्रोस्थेटिक्स, मेकअप आणि शूटिंगदरम्यानची मेहनत दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अभिनेता सत्यदेव यांचा या चित्रपटासाठी करण्यात आलेला शारीरिक बदलही या व्हिडिओचे प्रमुख आकर्षण ठरला.

Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम

चित्रपटात सत्यदेव एका शाही व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जांभळ्या रंगाची शेरवानी, पारंपरिक पगडी, मोत्यांचा हार आणि विशेष कॉन्टॅक्ट लेन्स अशा राजेशाही लूकमध्ये त्यांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. या लूकमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

चित्रपटात केवळ सत्यदेवच नव्हे, तर दीपा थॉमस, विकास मुप्पला, बाला पराशर, आनंद भारती, प्रणय वका आणि मास्टर किरण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. कार्तिक परमार यांनी छायांकन, स्मरण साई यांनी संगीत, तर रोहन सिंग यांनी प्रॉडक्शन डिझाइनची जबाबदारी सांभाळली आहे.

निर्मात्यांच्या मते, 'राव बहादुर' हा केवळ भव्य दृश्यांचा चित्रपट नसून, भूतकाळातील रहस्य, वारसा आणि दडलेल्या सत्यांचा शोध घेणारा मानसशास्त्रीय थरारपट आहे. त्यामुळे ३ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra