Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Satara News: राष्ट्रवादीकडून भाजप सदस्याची अडवणूक!; कोरेगाव पंचायत समितीत निधी वाटपावरून रणकंदन

Satara News: राष्ट्रवादीकडून भाजप सदस्याची अडवणूक!; कोरेगाव पंचायत समितीत निधी वाटपावरून रणकंदन

  • वाठार स्टेशन गणातील नागरी आणि विकासकामांसाठी पुरेसा निधी दिला जात नाही.
  • राष्ट्रवादीचे सत्ताधारी स्वतःच्या सदस्यांच्या गणात जास्त निधी वळवून मनमानी करत आहेत.
  • प्रशासकीय पारदर्शकता टाळण्यासाठी पत्रकारांना मासिक सभांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न.
Satara News:देशात राज्यात तसेच सातारा जिल्ह्यात सत्ताधीश असलेल्या भाजपच्या कोरेगावं पंचायत समितीच्या वाठार स्टेशन गणाच्या महिला सदस्याला निधी वाटपात राष्ट्रवादी कडून दुजाभाव मिळत असल्याचा आरोप भाजप च्या कोरेगाव पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे यांनी केला आहे. या बाबत तत्काळ सुधारणा न केल्यास लवकरच जन आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी आज कोरेगाव येथे पत्रकार परिषदेत दिला आहे. तसेच कोरेगाव मधील पत्रकार यांना पंचायत समिती कारभराची माहिती देण्याबाबत तसेच मासिक सभेत बसण्यासाठी विरोध करत असल्याबाबत त्यांनी जाहीर निषेध केला आहे.

आज सकाळी कोरेगाव येथील पंचायत समिती बाहेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निधी वाटपात महिला सदस्यांना डावल्याने वाठार स्टेशनं गणांतील अनेक काम रखडली असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी मात्र सत्तेचा गैरवापर करत स्वतः च्या सदस्यांना भरीव निधी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कोरेगाव पंचायत समिती वर राष्ट्रवादीची सत्ता आहे. या पंचायत समिती मध्ये भाजपच्या वाठार स्टेशनं गणांतून अनिता भोईटे या एकमेव महिला सदस्या निवडून आल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाची एक महिला सदस्या निवडून आल्या तर राष्ट्रवादी दोन्ही गटाचे एकूण 9 सदस्य निवडून आले. यामुळे या पंचायत समिती वर त्यांची एक हाती सत्ता आहे.

यावेळी अनिता भोईटे म्हणाल्या, ”कोरेगाव पंचायत समितीच्या निधी वाटपात वाठार स्टेशन गणावर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगातील ७० लाखाचा निधी हक्काचा असताना फक्त २३ लाख रुपयेच मंजूर करून दुजाभाव करण्यात आला आहे. निधीवाटप राजकीय पक्ष पाहून न करता गरज व नियमानुसार व्हावे, न्याय न मिळाल्यास जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपच्या वाठार स्टेशन पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे यांनी दिला. यावेळी वाठार स्टेशनं चे माजी उप सरपंच संजय भोईटे, सेवासोसायटी चेअरमन बळीराम काळोखे उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra