Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Satara News : शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय? सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल

Satara News : शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय? सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल

  • शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय?
  • सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल
सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरातील रस्त्याकडेला वाढलेली अतिक्रमणे नगरपालिकेने बुलडोझर कारवाई करून ती पाडली आहेत.
रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे शिवधनुष्य सातारा नगरपालिकेने हाती घेऊन प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी या माध्यमातून सुरू केली आहे. सातारा नगरपालिकेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे आता या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरपालिकेने हाती घेतलेले काम कौतुकास्पद आहे. या मार्गावरील अतिक्रमण हटावामुळे आता कास सज्जनगड या परिसरात तसेच परळी व अन्य ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना सुलभ होणार आहे. विशेषतः सातारा कास हे जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत असल्याने येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून असंख्य पर्यटक कास निसर्ग सौंदर्याला भेटी देत असतात. या पर्यटकांना ये जा करण्यासाठी समर्थ मंदिर चौकातूनच पुढे जावे लागते. मागील पाच सहा वर्षात या परिसरात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पर्यटकांना या मार्गावरून प्रवास करणे कठीण जात होते. याची गंभीर दखल घेत सातारा नगरपालिका प्रशासनाने या परिसरातील अतिक्रमणे हटवण्याचा निर्धार केला आहे.

सातारा शहरालगत असलेले शाहूपुरी परिसरातील शाहूपुरी या चौकात व्यवसायिकांनी केलेले अतिक्रमण नागरिकांसाठी घोकादायक ठरत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढलेली असल्याने वाहनांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या चौकातून ये जा करणाऱ्या नागरिकांबरोबरच वाहनांची संख्या अधिक असल्याने शाहूपुरी चौकात वाहतुकीची कोंडी नियमितपणे होत असल्याचे दिसून येत आहे, शहरातून आयटीआय मोळाचा ओढा कोंडवे याकडे जाण्यासाठी नागरिकांना व वाहन चालकांना या चौकातून जावे लागते तसेच आंबेदरे, दिव्यनगरी, माळवाडी या भागातील नागरिकांना शहरात येताना या चौकातून ये जा करावी लागते त्यामुळे या चौकातील अतिक्रमणे नगरपालिका प्रशासनाने दूर करून नागरिक व वाहनचालकांना दिलासा द्यावा.
– श्रीरंग काटेकर, सातारा

Gram Panchayat Elections: कोल्हापूर जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल; गावपातळीवरील राजकारण तापणार

अनेक अतिक्रमणे भूईसपाट; रस्ता घेतोय मोकळा श्वास
अदालत वाडा ते समर्थ मंदिर चौक परिसरात असंख्य अनधिकृत अतिक्रमणे भूईसपाट झाल्याने आता येथील अरुंद रस्ते रुंद झाले आहेत. नागरिकांमधून या कृतीचे समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाने मनावर घेतले तर अशक्य ते शक्य करता येते हेच यावरून दिसून येते. साताऱ्यातील वाढते अतिक्रमणे हा चिंतेचा विषय ठरत असताना सातारा नगरपालिका प्रशासनाने घेतलेली कडक भूमिकेमुळे अतिक्रमण माफियांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील विविध भागातील असणारे अतिक्रमणे याच पद्धतीने हटवली पाहिजेत अशी भूमिका साताऱ्यातील नागरिकांची आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणे या विषयाला आता गती मिळाली असून समर्थ मंदिर चौकापासून यास प्रारंभ झाला आहे.

Gokul Dudh Sangha बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; सत्ताधारी गटाला मोठा दिलासा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra