Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Satara Politics: जिल्हा बँक निवडणुकीत शेवटच्या ठरावाकडे लक्ष; हातगेघर सोसायटी ठरणार निर्णायक

Satara Politics: जिल्हा बँक निवडणुकीत शेवटच्या ठरावाकडे लक्ष; हातगेघर सोसायटी ठरणार निर्णायक

  • हातगेघर सोसायटीचा ठराव आज
  • शिवेंद्रसिंहराजे-शशिकांत शिंदे गटात प्रतिष्ठेची लढाई
  • हातगेघर सोसायटीच्या ठरावावर मानकुमरे यांची प्रतिष्ठा पणाला

दत्तात्रय पवार , मेढा :सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात जिल्हा बँक निवडणुकीसाठी सोसायटीचे ठराव हे हिंसक वळणावर पोचले आहेत.

अंतिम टप्प्यामध्ये एकमेव उरलेल्या हातगेघर सोसायटीच्या ठरावासाठी जि.प.सदस्य वसंतराव मानकुमरे यांची चांगलीच प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तब्बल वीस दिवसानंतर आज हातगेघर सोसायटीचे सहलीवर गेलेले पाच संचालक गावात परतणार आहेत. त्यामुळे या सोसायटीचा ठराव कोणाच्या बाजूने होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जावळी तालुक्यात सोसायट्यांचे ठराव हे विवाद विवादांमध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत.आखाडे गावात तर हा वाद टोकाला गेला होता.मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व प्रदेशाध्यक्ष शिंदे यांचे समर्थक अक्षरशः पोलिसांसमोर एकमेकांना भिडले होते.यावेळी कोनाकोणाच्या कानाखाली बसली याची गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे. ठराव आपल्याच गटाला घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे विरुद्ध बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

Satara News: राष्ट्रवादीकडून भाजप सदस्याची अडवणूक!; कोरेगाव पंचायत समितीत निधी वाटपावरून रणकंदन

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे या ठराव प्रक्रियेत मैदानात उतरलेले असून तालुक्यातील शेवटचा हातगेघर सोसायटी ठराव फक्त उरलेला आहे. हातगेघर, कावडी, पानस,विवर,आखेगणी, सायघर अशा सहा गावांची ही सोसायटी असून या सोसायटीवर तालुक्याचे भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांचे वर्चस्व आहे. मात्र वर्चस्व असताना देखील एकूण दहा संचालक असलेल्या सोसायटीमधील पाच संचालक हे शशिकांत शिंदे यांनी वीस दिवसांपूर्वीच सहलीवर नेले आहेत. त्यामुळे मानकुमरे यांची चांगलीच पंचायत झालेली पाहायला मिळते.

सहा गावांचा मेळ मानकुमरेभाऊ घालणार का?

हातगेघर सोसायटीत सहा गावांचा समावेश आहे. या सोसायटीचा ठराव आपल्या गटाचा व्हावा असे आदेश मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मानकुमरे यांना दिले आहेत. त्यामुळे गेली आठ दिवसांपासून वसंतराव मानकुमरेभाऊ हे गावात तळ ठोकून आहेत. आज बुधवारी होणाऱ्या ठरावाच्या बैठकीत पुरेसे संख्याबळ नसतानाही आपला स्वतःचा ठराव व्हावा यासाठी या सहा गावांचा मेळ घालण्यात मानकुमरेभाऊ यशस्वी होतात का हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान आज बुधवारी हातगेघर सोसायटीचा ठराव एकीकडे होत असतानाच याच गावात बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. तर याच हातगेघर मध्ये राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे सोसायटी व्हाईस चेअरमन नारायण पार्टे यांच्या ६५ वा अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी या होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समर्थक हातगेघर गावात हजर राहत असल्याने मोठा राडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र प्रशासनाने जावळीत जमावबंदी आदेश व कलम १४४ लागू केले आहे.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयात रॅम्प नसल्याची तक्रार; साताऱ्यात दिव्यांग बांधव आक्रमक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra