जेवणाच्या डब्यात नेहमीच कोणती भाजी बनवावी? असा प्रश्न सगळ्यांचं कायम पडतो. नेहमीच कढधान्य खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांच खूप जास्त इच्छा होते. लहान मुलांना बटाटा भाजी खायला खूप जास्त आवडते.
पण वारंवार बटाटा खाल्ल्यामुळे अपचनाच्या समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी टेस्टी रताळ्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली रताळ्याची भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. भेंडी, शिमला मिरची, बटाटे खाऊन कंटाळा आल्यानंतर झटपट रताळ्याची भाजी बनवावी. रताळी चवीला गोड असतात. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात नियमित एक किंवा दोन रताळी खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया रताळ्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य - pinterest)
साहित्य:
- रताळी
- तेल
- जिरं
- हळद
- आलं
- टोमॅटो
- लाल तिखट
- काळे मीठ
- भाजलेल्या जिऱ्याची पावडर
- लिंबाचा रस
कृती:
- रताळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात आलं आणि टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालू नये.
- रताळी काहीवेळ पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक मध्यम आकाराचे तुकडे करा.
- कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि रताळ्याचे तुकडे घाला. त्यानंतर त्यात हळद घालून ५ मिनिटं मंद आचेवर रताळे शिजण्यासाठी ठेवा.
- रताळी मऊ झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळे मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करा.
- भाजी तयार झाल्यानंतर त्यात टोमॅटोची पेस्ट घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चविष्ट रताळ्याची भाजी.

