Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर

सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर

  • ॲमेझॉन लवकरच LEO सॅटेलाइटवर आधारित D2D (डायरेक्ट-टू-डिवाइस) सर्विस लाँच करण्याच्या तयारीत आहे.
  • या तंत्रज्ञानामुळे मोबाईल टॉवरशिवाय थेट सॅटेलाइटद्वारे फोनला नेटवर्क मिळणार आहे.
  • दुर्गम, डोंगराळ आणि नेटवर्क नसलेल्या भागातही आपत्कालीन संपर्क आणि कनेक्टिव्हिटी शक्य होणार आहे.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनलवकरच त्यांची एक नवीन D2D सर्विस लाँच करण्याची तयारी करत आहे. ॲमेझॉनची ही सॅटेलाईट बेस्ड सर्विस स्टारलिंकच्या डायरेक्ट-टू-डिवाइस सर्विसप्रमाणेच असणार आहे. या सर्विसमध्ये इंटरनेट सर्विस डायरेक्ट फोनमध्ये ॲक्सेस केली जाऊ शकते. स्टारलिंकने यापूर्वी अमेरिकन टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर T-Mobile च्या सहकार्याने डायरेक्ट-टू-डिवाइस (D2D) सर्विसची चाचणी केली होती. त्यानंतर ॲमेझॉन देखील त्यांच्या या सर्विसची चाचणी करत आहे.

नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच स्वस्त झाला Pixel 10! ऑफर्स आणि डिस्काऊंटसहस खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ही डील चुकवू नका

समोर आलेल्या काही रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, ॲमेझॉनने यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांची सॅटेलाइट बेस्ड डायरेक्ट-टू-डिवाइस सर्विस लाँच करण्याबाबत काही संकेत दिले होते. या उद्देशासाठी कंपनी प्रमुख उपग्रह ऑपरेटर ‘ग्लोबलस्टार’ (Globalstar) चे अधिग्रहण करण्यास सज्ज आहे. पण कंपनीची ही सर्विस नक्की काय आहे आणि याचा कशा पद्धतीने वापर केला जाऊ शकतो, याबद्दल आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Amazon)

काय आहे D2D टेक्नोलॉजी?

नावावरून समजते की, D2D म्हणजेच डायरेक्ट-टू-डिवाइस टेक्नोलॉजी. यामध्ये कोणत्याही मोबाईल टॉवरचा वापर केला जात नाही. हे तंत्रज्ञान एखाद्या मोबाईल फोन किंवा डिव्हाईसला दुसऱ्या डिव्हाईससोबत डायरेक्ट सॅटेलाइटच्या माध्यमातून कनेक्टिविटी प्रदान करते. या सर्विसमध्ये मोबाईल फोनला थेट अंतराळात फिरत असणाऱ्या LEO म्हणजेच लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइटकडून सिग्नल मिळतो.

या तंत्रज्ञानाचा फायदा असा आहे की, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कनेक्टिविटी मिळणार आहे. तुम्ही जंगलात असाल किंवा समुद्राच्या किनारी किंवा वाळवंटात, तुमच्या मोबाईलवर प्रत्येक ठिकाणी सिग्नल असणार आहे. तुम्ही तुमच्या फोनने कोणासोबतही संपर्क करू शकतात. स्टारलिंकने D2D सर्विससाठी अमेरिकन मोबाइल ऑपरेटर T-Mobile आणि Verizon सोबत भागिदारी केली आहे.

ॲमेझॉन D2D टेक्नोलॉजीचा असा होणार फायदा

ॲमेझॉन त्यांच्या LEO सॅटेलाइट्सना Globalstar च्या इंफ्रास्ट्रक्चरसोबत जोडणार आहे, ज्याद्वारे यूजर्सना थेट सॅटेलाईटमधून सिग्नल मिळणार आहे. या सर्विसचा फायदा डोंगराळ भागात आणि खेडेगावात राहणाऱ्या लोकांना होणार आहे. विशेषत: अशा ठिकाणी जिथे नेटवर्क खूप कमकुवत आहे किंवा उपलब्धच नाही, अशा ठिकाणी राहणारे नागरिक या सर्विसचा फायदा घेऊ शकणार आहेत.

Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत… ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स

सॅटेलाइट बेस्ड कनेक्टिविटीचा सर्वात मोठी फायदा आपत्कालीन परिस्थितीत होणार आहे. जेव्हा लोकांना वाचवण्यासाठी संपर्क करण्याची गरज भासणार असेल. D2D सर्विस सॅटेलाइट इंटरनेटपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. सॅटेलाइटवरून सिग्नल मिळवण्यासाठी राउटर किंवा डिशची गरज भासणार नाही; त्याऐवजी, मोबाइल डिव्हाइस थेट सॅटेलाइट सिग्नल प्राप्त करेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra