Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम

Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम

शाहरुख खानच्या सह-मालकीच्या नाइट रायडर्स ग्रुपने क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. लॉस एंजेलिसमध्ये स्वतःचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारत हा ग्रुप स्वतःचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान असलेला जगातील पहिला ग्लोबल क्रिकेट ब्रँड ठरला आहे.

या नव्या नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंडवर नुकताच लॉस एंजेलिस नाइट रायडर्स (LAKR) आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यातील पहिला मेजर लीग क्रिकेट (MLC) सामना यशस्वीरीत्या पार पडला.

या स्टेडियमच्या उद्घाटनामुळे अमेरिकेतील क्रिकेटच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. ICC च्या मानकांनुसार उभारण्यात आलेल्या या मैदानामध्ये आठ खेळपट्ट्या, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान, 120 फूट उंचीचे सहा फ्लडलाइट टॉवर्स आणि आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. हे स्टेडियम उभारण्यासाठी तब्बल 32 हजार मेट्रिक टनांहून अधिक माती हटवण्यात आली.

या ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलताना नाइट रायडर्स ग्रुपचे सह-मालक शाहरुख खान म्हणाला, 'एकेकाळी जे फक्त स्वप्न होतं, ते आज प्रत्यक्षात साकार झालं आहे. लॉस एंजेलिसमध्ये क्रिकेटचं कायमस्वरूपी घर उभं राहणं हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हे मैदान केवळ क्रिकेटपुरतं मर्यादित राहणार नाही, तर समुदाय, मनोरंजन आणि कुटुंबांना एकत्र आणणारं केंद्र बनेल.'

Shraddha Kapoor Fees for Eetha: विठाबाई नारायणगावकरांच्या भूमिकेसाठी श्रद्धाने घेतलं तब्बल 'इतकं' मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क

नाइट रायडर्स स्पोर्ट्सचे CEO वेंकी म्हैसूर यांनीही या प्रकल्पाला क्रिकेटच्या भविष्याचा पाया असल्याचे म्हटले. 'जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देत खेळाडू, चाहते आणि स्थानिक समुदायासाठी सर्वोत्तम क्रिकेट अनुभव निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,' असे ते म्हणाले.

या स्टेडियमवरील पहिल्या सामन्यापूर्वी NBA विजेता मेटा वर्ल्ड पीस (रॉन आर्टेस्ट) यांनी सेरेमोनियल फर्स्ट बॉल टाकून या ऐतिहासिक क्षणाला आणखी खास बनवले. त्यांच्या उपस्थितीमुळे अमेरिकेतील मुख्य प्रवाहातील क्रीडा संस्कृती आणि क्रिकेट यांच्यातील वाढता दुवा अधोरेखित झाला.

दरम्यान, 1 जुलै ते 5 जुलै या कालावधीत नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंडवर मेजर लीग क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे लॉस एंजेलिसमध्ये प्रथमच जागतिक दर्जाच्या T20 क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार असून, अमेरिकेतील क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेला या स्टेडियममुळे नवी दिशा मिळणार आहे.

नाइट रायडर्स ग्रुपकडे सध्या कोलकाता नाइट रायडर्स (IPL), ट्रिनबागो नाइट रायडर्स (CPL), अबू धाबी नाइट रायडर्स (ILT20) आणि लॉस एंजेलिस नाइट रायडर्स (MLC) अशा चार व्यावसायिक क्रिकेट फ्रँचायझी आहेत. आतापर्यंत या ग्रुपने विविध स्पर्धांमध्ये एकूण नऊ विजेतेपदे पटकावत जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra