Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Share Market Today: गिफ्ट निफ्टीची मजबूत कामगिरी; आज शेअर बाजारात तेजीची शक्यता! 'हे' स्टॉक्स पालटणार तुमचं नशिब

Share Market Today: गिफ्ट निफ्टीची मजबूत कामगिरी; आज शेअर बाजारात तेजीची शक्यता! 'हे' स्टॉक्स पालटणार तुमचं नशिब

  • गिफ्ट निफ्टी 151 अंकांच्या प्रीमियमवर असल्याने आज भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडण्याची शक्यता आहे.
  • तज्ज्ञांनी आजच्या इंट्राडे ट्रेडिंगसाठी नायका, भारती एअरटेल, वरुण बेव्हरेजेस, अनंत राजसह अनेक शेअर्सची शिफारस केली आहे.
  • अदानी एंटरप्रायझेस, कोल इंडिया, बीपीसीएल, पीएनबी, मॅरिको आणि टेक्समॅको रेलसह अनेक शेअर्स आज गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील.
India Share Market Update:जागतिक बाजारातील संमिश्र कल पाहता, आज ३ जुलै रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १५१ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,४१६ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे देशातील इंधन दरांबाबत सर्वात मोठे विधान

गुरुवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. बेंचमार्क निफ्टी ५० २४,१०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स ५७९.४८ अंकांनी, म्हणजेच ०.७५ टक्क्यांनी वाढून ७७,५०२.१२ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० १६९.८५ अंकांनी, म्हणजेच ०.७१ टक्क्यांनी वाढून २४,१७५.७० अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टी निर्देशांक गुरुवारी ५८,०३१.६५ वर सपाट बंद झाला. (फोटो सौजन्य: Pinterest)

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये पाइन लॅब्स, अनंत राज आणि बिर्लासॉफ्टचे शेअर्स यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना पाच शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सुमीत बागडिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये एनआयआयटी लिमिटेड, आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेड, डीसीबी बँक लिमिटेड, दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पॉली मेडिक्युअर लिमिटेड यांचा समावेश आहे.

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल या शेअर बाजारातील तज्ज्ञांनी इंट्राडे ट्रेडिंगवेळी आज गुंतवणूकदांराना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या शेअर्समध्ये एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड (नायका), झायडस वेलनेस लिमिटेड, भारती एअरटेल लिमिटेड, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, वरुण बेवरेजेस लिमिटेड, एन्वायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड, अनंत राज लिमिटेड आणि ईपॅक प्रीफॅब टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांचा समावेश आहे.

Akasa Air : अकासा एअरने राजस्थानमध्ये केला प्रवेश! या नव्या मार्गिकेवरून होणार प्रवास सुरु

भारतीय शेअर बाजारात व्यवहार करताना आज गुंतवणूकदार अदानी एंटरप्रायझेस, कोल इंडिया, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल), स्टरलाइट टेक्नॉलॉजीज, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), वरुण बेवरेजेस, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, सीएसबी बँक, पीसी ज्वेलर्स, बीएलएस ई-सर्व्हिसेस, मॅरिको, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra