Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Share Market Today: गुंतवणूकदांरानो सावधान! लाल रंगात होऊ शकते बाजाराची सुरुवात; ट्रेडिंगपूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Today: गुंतवणूकदांरानो सावधान! लाल रंगात होऊ शकते बाजाराची सुरुवात; ट्रेडिंगपूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

  • अमेरिका-इराण तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आज भारतीय शेअर बाजार घसरणीसह सुरू होण्याची शक्यता आहे.
  • गिफ्ट निफ्टी 234 अंकांच्या डिस्काउंटवर व्यवहार करत असून सेन्सेक्स-निफ्टीसाठी गॅप-डाउन ओपनिंगचे संकेत मिळत आहेत.
  • तज्ज्ञांनी आज सोना बीएलडब्ल्यू, हॅवेल्स इंडिया, ग्लँड फार्मा, एलटीएम आणि इंडिया निप्पॉन इलेक्ट्रिकल्स या शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
India Share Market Update: अमेरिका आणि इराण यांच्यामधील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीं यांचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे. जागतिक बाजारातील कमोजरीचा विचार करता आज बुधवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास २३४ पॉइंट्सच्या डिस्काउंटवर, २४२२५ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर पुन्हा घसरले! आता 1 तोळा खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

मंगळवारी, भारतीय शेअर बाजाराची चार दिवसांची तेजी थांबली आणि बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स १०४.३५ अंकांनी, म्हणजेच ०.१३ टक्क्यांनी घसरून ७८,१८०.७२ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३१.६५ अंकांनी, म्हणजेच ०.१३ टक्क्यांनी घसरून २४,३९८.७० वर स्थिरावला. बँक निफ्टी निर्देशांक मंगळवारी ९०.८० अंकांनी, म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी घसरून ५८,२००.७० वर बंद झाला. (फोटो सौजन्य: Pinterest)

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आज कोचीन शिपयार्ड, पूनवाला फिनकॉर्प, प्रीमियर एनर्जीज, आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी, एचसीएल टेक्नॉलॉजीज, सीगल इंडिया, उनो मिंडा, ग्लेनमार्क फार्मा, सिल्व्हर टच टेक्नॉलॉजीज या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्स, हॅवेल्स इंडिया, ग्लँड फार्मा, एलटीएम आणि इंडिया निप्पॉन इलेक्ट्रिकल्स यांचा समावेश आहे.

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतणूकदारांना तीन शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये सॅजिलिटी, मॅरिको आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांचा समावेश आहे.

SITA ची आर्थिक कामगिरी मजबूत! 2050 पर्यंत 10 अब्ज प्रवाशांचे लक्ष्य, AI मुळे इंधन बचत आणि कमी प्रदूषण

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल या शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या शेअर्समध्ये जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, इंडसइंड बँक लिमिटेड, फेडरल बँक लिमिटेड, स्विगी लिमिटेड, आरबीएल बँक लिमिटेड , आयटीसी हॉटेल्स लिमिटेड, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि रेन इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra