Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शरीरातील विषारी घटकांमुळे आरोग्य बिघडलं आहे? कोमट पाण्यात मिक्स करून प्या 'ही' हिरवी पावडर, बद्धकोष्ठता- अपचनचा त्रास होईल कमी

शरीरातील विषारी घटकांमुळे आरोग्य बिघडलं आहे? कोमट पाण्यात मिक्स करून प्या 'ही' हिरवी पावडर, बद्धकोष्ठता- अपचनचा त्रास होईल कमी

शेवग्याच्या पानांचे फायदे? शेवग्याच्या पावडरचे कशा पद्धतीने सेवन करावे?
वजन कमी करण्यासाठी उपाय?

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, कमी पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.

त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. जीवनशैलीतीलबदलांमुळे शरीरसंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, गॅस तर काहीवेळा शरीराला गंभीर आजारांची लागण सुद्धा होते. आतड्यांमध्ये विषारी घटक साचून राहिल्यामुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते. हे विषारी घटक फॅटी लिव्हर किंवा शरीरसंबंधित इतर आजार निर्माण करतात. त्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला कोमट पाण्यात शेवग्याच्या शेंगांची पावडर मिक्स करून प्यायल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य - istock)

Stomach Flu: वारंवार पोटात इन्फेक्शन होतंय? 'ही' कारणे असू शकतात जबाबदार

शेवग्याच्या शेंगा सुपरफूड म्हणून ओळखल्या जातात. भारतीय घरांमध्ये आवर्जून शेवग्याच्या शेंगांचे सेवन केले जाते.पोटात वाढलेला जडपणा किंवा अपचन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात अर्धा चमचा शेवग्याच्या शेंगांची पावडर मिक्स करून प्यायल्यास जुनाट बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या सर्व त्रासांपासून कायमची सुटका मिळेल. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. नियमित संपूर्ण शरीर डिटॉक्स होणे फार आवश्यक आहे. अन्यथा आजारपण वाढून संपूर्ण आरोग्य बिघडून जाते.

शेवग्याच्या शेंगांमधील आवश्यक पोषक घटक:

शेवग्याच्या शेंगा किंवा पाने शरीरासाठी खजिना आहेत. या पानांमध्ये विटामिन ए, सी, ई, विटामिन बी, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा शेवग्याच्या पानांना विशेष महत्व आहे. यामध्ये नऊ अत्यावश्यक अमिनो अ‍ॅसिड्स असतात, ज्यामुळे कम्प्लीट प्रोटीनचा दर्जा शरीराला मिळतो. याशिवाय शेवग्याच्या शेंगांमध्ये शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स आणि आयसोथियोसायनेट्स नावाचे घटक असतात. यामुळे शरीराला आतून आलेली सूज कमी होते आणि आरोग्य सुधारते.

Morning Headache: रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास? दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय 'हे' संकेत

वजन कमी करण्यासाठी प्रभावी:

वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे तर काहीवेळा सप्लिमेंट्सचे सुद्धा सेवन केले जाते. पण यामुळे फारसा फरक दिसून येत नाही. अशावेळी नियमित कोमट पाण्यात शेवग्याच्या पानांची पावडर मिक्स करून प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी होईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. यामध्ये असलेले आयसोथियोसायनेट्स शरीरात नवीन चरबीच्या पेशी तयार करण्याचा वेग कमी करतात. तसेच रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचे सेवन केले जाते. शरीरातील जुनाट सूज कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra