Wednesday, 27 Jan, 9.53 pm नवराष्ट्र

होम
शेतकरी आंदोलनातील हिंसा | ट्विटरकडून ५०० हून अधिक ट्विटर अकाउंट्स सस्पेंड

कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल हिंसक वळण मिळाले. आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी आंदोलक पेटून उठले. लाल किल्ला परिसरात आंदोलक शेतकऱ्यांचे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र पहायला मिळाले. याचा पार्श्वभूमीवर काल दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश गृहमंत्र्यालयाकडून देण्यात आले होते. रात्री १२ वाजेपर्यंत दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. दिल्लीत काल ट्रॅकर परेड दरम्यान झालेल्या हिंसेनंतर ट्विटरने ५०० हून अधिक ट्विटर अकाउंट्स स्थगित केले.

दिल्ली (Delhi). कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल हिंसक वळण मिळाले. आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी आंदोलक पेटून उठले. लाल किल्ला परिसरात आंदोलक शेतकऱ्यांचे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र पहायला मिळाले. याचा पार्श्वभूमीवर काल दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश गृहमंत्र्यालयाकडून देण्यात आले होते. रात्री १२ वाजेपर्यंत दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. दिल्लीत काल ट्रॅकर परेड दरम्यान झालेल्या हिंसेनंतर ट्विटरने ५०० हून अधिक ट्विटर अकाउंट्स स्थगित केले.

ट्विटरने सांगितल्या प्रमाणे या अकाउंटवर लेबलही लावण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची हिंसा, गैरव्यवहार आणि धमक्यांना या प्लॅटफॉर्मवर कोणतीही जागा नाही असे ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. ट्विटरवर स्थगित केलेल्या अकाउंट्सना लेबल लावण्यात आले आहेत. या सर्व ट्विटर अकाउंटवर नजर ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर काही विधाने वादग्रस्त वाटत असतील तर ते अकाउंट किंवा ट्विट तुम्ही रिपोर्ट करु शकता असेही ट्विटरकडून सांगण्यात आले आहे. काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण मिळाले.

आंदोलक शेतकऱ्यांकडून पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांच्या पाठलागही करण्यात आला. हे आंदोलक आंदोलन आणखी पेटू त्याचबरोबर पसरत असलेल्या अफवांना आळा बसावा यासाठी गृहमंत्रालयाकडून दिल्लीत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

दिल्लीतील पेटलेले आंदोलन आणखी चिघळू नये त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत असलेल्या अफवा टाळाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर ट्विटच्या माध्यमातून वादग्रस्त विधाने करुन परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी ट्विटरकडून ५०० हून अधिक ट्विटर अकाउंट स्थगित करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top