Dailyhunt
शेवटी बाप तो! मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी रेल्वे रुळावर मारली उडी, ट्रेनचे 8 डबे अंगावरुन गेले; थरारक Video Viral

शेवटी बाप तो! मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी रेल्वे रुळावर मारली उडी, ट्रेनचे 8 डबे अंगावरुन गेले; थरारक Video Viral

  • धावत्या ट्रेनमधून उतरताना एक अनपेक्षित प्रसंग घडला.
  • क्षणाचाही विलंब न करता वडिलांनी मोठा निर्णय घेतला.
  • पुढे जे घडलं ते पाहून अनेकजण थक्क झाले.
आई मायेचे प्रतीक तर वडिलांना मुलाची ढाल म्हणून ओळखले जाते.
आयुष्यात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगातून आपल्याला सुखरुप बाहेर काढण्यात वडिल नेहमीच कवच बनून तयार असतात. सध्या याच पार्श्वभूमीवर एक थरारक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात मुलाचे प्राण वाचवण्यासाठी वडिलांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकल्याचे दिसले. घटना बांगलादेशातील भैरब रेल्वे स्टेशनवर घडून आली. एक वर्षांचे बाळ रेल्वे रुळावर पडले पण वडिलांच्या धैर्याने आणि प्रसंगावधानाने दोघांचाही जीव वाचवला. मुख्य म्हणजे सांगण्यात येत आहे की, यावेळी त्यांच्या अंगावरुन तब्बल ७ गाड्या ओलांडल्या मात्र तरीही ते या अपघातातून सुखरुप बाहेर पडले. हे नक्की कसं घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral

नक्की काय घडलं?

सोशल मिडियावर व्हायरलहोत असलेली ही फिल्मी घटना तंतोतंत खरी आहे आणि ती २८ एप्रिल रोजी बांग्लादेशातील रेल्वे स्थानकावर घडून आल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक वृत्तानुसार, ट्रेन सुमारे दीड तास, म्हणजेच अंदाजे ९० मिनिटे उशिरा धावत होती. जेव्हा ट्रेन स्टेशनवर थांबली, तेव्हा वडिलांना वेळेवर उतरता आले नाही. ट्रेन पुन्हा सुरू होताच, घाबरलेल्या वडिलांनी आपल्या मुलाला कवेत घेऊन धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. या घाईगडबडीत, ते निष्पाप बाळ त्यांच्या हातातून निसटले आणि थेट रुळांवर पडले. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांना रेल्वे रुळावर उडी मारली आणि त्याला कुशीत घेत तिचेच आडवे झोपले. रेल्वेचे आठ डबे त्यांच्यावरून गेले पण वडीलांना खंबीरपणे ही परिस्थिती हाताळली. ट्रेन जाताच, प्लॅटफॉर्मवरील लोकांनी वडील आणि मुलाला सुरक्षितपणे रुळांवरून बाहेर काढले. यात दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही जे कोणत्या चमत्काराहून कमी नाही.

घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटनर चांगलाच चर्चेत असून @sanatan_kannada नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका युजरने लिहिले आहे, "वडिल मुलासाठी रक्षकच असतो" तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "ते सुखरुप बाहेर पडले का?" आणखीन एका युजरने लिहिले आहे, "हे फारच भयानक होते".

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra