- बेडकाने सापालाच शिकार बनवल्याचा अनोखा व्हिडिओ व्हायरल.
- अन्नसाखळी उलटल्यासारखे दृश्य पाहून नेटकरी थक्क.
- व्हिडिओवर लाखो प्रतिक्रिया; 'आता काहीही होऊ शकतं' म्हणत यूजर्सच्या मजेशीर कमेंट्स.
काय घडलं व्हिडिओत?
अन्नसाखळीत आपण शिकलो आहोत की बेडकाची शिकार ही सापाद्वारे केली जाते. पण याच विज्ञानाला खोटं ठरवत व्हिडिओत वेगळ दृष्य दिसून आलं. यात आपल्याला दिसतंय की, साप बेडकाची नाही तर बेडूकच सापाला आपला शिकार बनवत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात बेडकाच्या तोंडात सापाची शेपटी असून सापाचे तोंड बेडकाच्या विरुद्ध दिशेला असते. आपला खातमा होणार आहे या विचाराने साप घाबरतो आणि मदतीसाठी याचना करु लागतो.
सापाचा चेहरा पाहून तो ओरडत असल्याचे स्पष्ट जाणवते पण बेडूक मात्र त्याला मुक्त करायला काही तयार नसतो. बेडकाने सापाची शिकार केल्याची ही घटना पहिल्यांदाच घडल्याने अनेकजण यातील दृष्ये पाहून थक्क झाले आहेत. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून निसर्गातील नियम कधीकधी काळानुसार कसे बदलत जातात किंवा नियम हे काळानुसार बदलू देखील शकतात याचे उदाहरण आपल्याला व्हायरल व्हिडिओतून पाहता येते.
Unique Wedding: अजब लग्नाची गजब गोष्ट, दोन जोडप्यांनी वेधलं देशाचे लक्ष, जाणून घ्या संपूर्ण गोष्टचं
हा व्हिडिओ @NayiSochHQ नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'हे कलियुग आहे, महाराज… इथे साप बेडकाला गिळत नाही, तर बेडूक सापाला गिळतो'. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, "अरे भावा, सगळंच उलटेपालटे झाले आहे, हा व्हिडिओ बघायला खूप मजा येतेय आणि हसू येतंय", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "मी हे आज पहिल्यांदाच पाहिलं, भावा", आणखी एका यूजरने लिहिले आहे, "आताच्या जगात काहीही होऊ शकतं".
टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

