Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shravan 2026 : श्रावणात महादेवांना अर्पण करा ही ५ पवित्र फुले; सुख-समृद्धीसोबत सकारात्मक ऊर्जाही मिळेल

Shravan 2026 : श्रावणात महादेवांना अर्पण करा ही ५ पवित्र फुले; सुख-समृद्धीसोबत सकारात्मक ऊर्जाही मिळेल

  • श्रावणात भगवान शंकराच्या पूजेत काही विशिष्ट फुले आणि पवित्र वनस्पतींना विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते.
  • ही झाडे घरात लावल्यास पूजेसाठी फुले सहज उपलब्ध होतात आणि घराचे सौंदर्यही वाढते.
  • धार्मिक मान्यतेनुसार, या वनस्पती घरात सकारात्मक ऊर्जा, सुख-समृद्धी आणि शांततेचे वातावरण निर्माण करण्यास मदत करतात.
श्रावण महिना लवकरच सुरु होणार असून या महिना भगवान शंकरालाअर्पण केला जातो. याकाळात अनेकजण व्रत-वैकल्य, पूजा-अर्चा करतात. धार्मिक मान्यतेनुसार, याकाळात भगवान शंकर पृथ्वीवर विहार करण्यासाठी येतात आणि भक्तांना आपला आशिर्वाद देऊन जातात. हेच कारण आहे की या महिन्यात उपवास, पूजा, शिवमंदिरांना भेट देणे या धार्मिक उपक्रमांना फार महत्त्व दिले जाते. अनेक लोक श्रावणी सोमवाराचा उपवास देखील पकडतात. श्रावण महिन्यात येणारे सोमवार नित्यनियमाने पाळून भाविक या दिवशी शंकराची मनोभावनेने पूजा करतात. या पूजेत काही विशिष्ट प्रकारचे फूल शंकराला अर्पण केले जातात. आम्ही तुम्हाला सांगतो की, भगवान शंकराला काही विशिष्ट फुले प्रिय आहेत. हे फूल पूजेत अर्पित केल्याने घरात फक्त सुख-शांती लाभत नाही तर घरात सकारात्मक वातावरण देखील तयार होते. तुम्ही या फुलांना तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत लावू शकता.

Gardening Tips : मोगऱ्याचं झाड फुलांनी बहरवायचंय? घरच्या घरी कचऱ्यापासून तयार करा नैसर्गिक द्रावण

बेलपत्र

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, महादेवाच्या पूजेत बेलपत्राला फार महत्त्व आहे. यातील तीन पाने शिवाच्या नेत्रांचे प्रतीक असल्याचे मानले जाते. जर तुमच्या घरजवळ मोकळी जागा असेल तर तिथे तुम्ही बेलाचे झाड लावू शकता. याला मोठ्या कुंडीत देखील उगवले जाऊ शकते. हे झाड हळूहळू मोठे होते ज्यामुळे पर्याप्त जागेची याला गरज असते.

शमीचे झाड

शमीचे झाड हे धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही दृष्ट्या फार महत्त्वाचे मानले जाते. शिवपूजेत याची पाने देवाला अर्पण केली जातात. हे झाड सूर्यप्रकाशात चांगले वाढते यामुळेच घरात जर हे झाड लावत असाल तर सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी त्याला ठेवा. एका मान्यतेनुसार, शमीचे झाड घरी लावल्याने घरात सकारात्मक उर्जा वाढते.

कनेरचे रोप

पिवळ्या आणि सफेद फुलांनी बहरणारे कनेरचे फुल शिवपूजेत अर्पण केले जाते. हे झाड घराची शोभा वाढवण्यास मदत करते. घरात कनेरचे झाड लावणे शुभ संकेत मानले जाते. तथापि, फांद्यांमध्ये पांढरा, दुधाळ रस येतो तो विषारी मानला जातो. यामुळेच लहान मुलांना किंवा प्राणी-पक्ष्यांना या झाडाजवळ पाठवू नये, या झाडाला हात लावल्यानंतर आपले हात स्वच्छ करायला विसरु नका.

चंपाचे झाड

चंपाचे फुल आपली सुंदरता आणि सुंगधासाठी ओळखले जाते. श्रावणात भगवान शिवाला चंपाचे फूल अर्पण करण्याची प्रथा आहे. हे फूल सूर्यप्रकाशात चांगले वाढते. तुम्ही बाल्कनीत किंवा घराच्या अंगणात याचे झाड लावू शकता. यामुळे घराच्या साैंदर्यात वाढ होईल आणि पूजेत फुलांचा वापरही होईल.

महागडे कोलेजन ड्रिंक पिणे कायमचे जाल विसरून! चेहऱ्यावरील नॅचरल चमक वाढवण्यासाठी नियमित करा 'या' पेयाचे सेवन

मोगऱ्याचे फूल

मोगऱ्याचा मनमोहक सुगंध अनेकांना याकडे आकर्षित करतो. अनेक भारतीय घरांमध्ये सणासुदीला किंवी पूजेत मोगऱ्याच्या फुलांचा वापर केला जातो. उन्हाळ्यात किंवा सूर्यप्रकाशात या झाडाची वाढ चांगली होते. नियमित पाणी आणि हलकी छाटणी केल्यास दिर्घकाळापर्यंत हे झाड घरात उगवले जाऊ शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra