Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Skin Care Tips: महागडे प्रोडक्ट नव्हे, तर 'या' सवयी देतील नॅचरल ग्लोइंग स्किन; जाणून घ्या

Skin Care Tips: महागडे प्रोडक्ट नव्हे, तर 'या' सवयी देतील नॅचरल ग्लोइंग स्किन; जाणून घ्या

  • ग्लोइंग स्कीन हवीये?
  • 'या' सवयी ठरतील फायदेशीर
  • महागड्या प्रोडक्ट्सची गरज नाही
आजकाल प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्यामुळे अनेकजण महागडी स्कीनकेअर प्रोडक्टस् (skincare products),फेशियल ट्रिटमेन्ट्स (facial treatments) आणि कॉसमेटिक प्रोडक्टस (cosmetic products) वापरताना दिसतात.
मात्र, केवळ बाहेरून त्वचेची काळजी घेणे पुरेसे नसते. योग्य आहार, पुरेशी झोप आणि चांगल्या सवयींचा त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. तज्ज्ञांच्या मते, शरीर आतून निरोगी असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवरही दिसून येतो. नॅचरल ग्लोइंग त्वचेसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, जाणून घ्या.

याशिवाय तणाव, प्रदूषण, अपुरी झोप आणि चुकीची जीवनशैली यांचाही त्वचेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना केवळ बाह्य सौंदर्यावर नव्हे, तर संपूर्ण आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक मानले जाते. रोजच्या छोट्या चांगल्या सवयींमुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

Weight Loss Tips: Belly Fat कमी करायचंय? डाएटची गरज नाही! 'या' सोप्या टिप्सने वजन करा कमी

आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा

ताजी फळे, हिरव्या भाज्या आणि ड्रायफ्रूट्स यांसारखे पौष्टिक पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. व्हिटॅमिन-C आणि अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थ त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. तसेच जंक फूड, प्रोसेस्ड पदार्थ आणि जास्त तेलकट अन्न कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.

पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे

अपुऱ्या झोपेमुळे चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसू शकतो. तज्ज्ञांच्या मते, दररोज ७ ते ८ तास शांत झोप घेतल्यास त्वचा फ्रेश आणि हेल्दी राहण्यास मदत होते. याशिवाय रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर टाळणेही आवश्यक मानले जाते.

नियमित व्यायाम आणि योगा करा

नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळण्यास मदत होते. व्यायामादरम्यान घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तसेच योगा आणि ध्यान तणाव कमी करून त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

साधी स्कीन केअर रुटीन पाळा

चेहऱ्यावर वारंवार केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरण्याआधी साधी स्कीन केअर रुटीन फॉलो करा. दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ धुणे त्वचेसाठी आवश्यक मानले जाते. बाहेर जाताना सनस्क्रीन वापरल्यास सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होऊ शकते. तसेच स्कीन टाइप ओळखूनच स्कीन केअर प्रो़डक्टस् वापरा.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart Health: निरोगी हृदयासाठी दररोज करा 'हे' व्यायाम ; या गोष्टींचीही घ्या काळजी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra