- टेक्नोने 0mm डिस्प्ले बॉर्डर असलेल्या नेक्स्ट-जेन कॉन्सेप्ट स्मार्टफोनचा पहिला टिझर जारी केला आहे.
- हा स्मार्टफोन IFA 2026 मधील शोस्टॉपर इव्हेंटमध्ये सादर केला जाणार असून त्यात नवीन डिस्प्ले तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
- सध्या हा फक्त कॉन्सेप्ट डिव्हाइस असून त्याच्या कमर्शियल लाँचबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
टेक्नोचा बेजल-लेस कॉन्सेप्ट फोन IFA 2026 मध्ये करणार पदार्पण
टेक्नोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, नेक्स्ट-जेन बेझललेस कॉन्सेप्ट फोन IFA 2026 च्या शोस्टॉपर ईव्हेंटमध्ये सादर केला जाणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, त्यांनी प्रगत इंटर्नल स्टॅकिंग, नवीन स्क्रीन पॅकेजिंग तंत्रज्ञान आणि स्ट्रक्चरल री-इंजिनिअरिंगच्या मदतीने 0mm डिस्प्ले बॉर्डर साध्य केली आहे, यामुळे डिस्प्ले आणि फ्रेम यांच्यामध्ये दिसणारी काळ्या रंगाची बॉर्डर पूर्णपणे हटवली जाणार आहे. (फोटो सौजन्य: X)
टिपस्टर आइस युनिव्हर्स (@UniverseIce) ने देखील या कॉन्सेप्ट फोनचे काही फोटो एक्सवर शेअर केले आहेत आणि हा ट्रूली 0mm डिस्प्ले बॉर्डरवाला इंडस्ट्रीचा पहिला स्मार्टफोन कान्सेप्ट असल्याचे म्हटलं आहे. टेक्नोने सोशल मीडियावर शेअर केलेल्याा टिझरमध्ये एक एज-टू-एज डिस्प्ले पाहायला मिळत आहे, जो समोरील पॅनलवर पूर्णपणे पसरला आहे. या आगामी हँडसेटमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी मध्यभागी एक पंच-होल कटआउट दिला आहे. कंपनीने अद्याप स्मार्टफोनच्या दुसऱ्या हार्डवेयर स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला नाही.
टेक्नो कंपनी बर्लिनमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या IFA 2026 शो स्टॉपर्स ईव्हेंटमध्ये हा कन्सेप्ट हँडसेट सादर करणार आहे. हा ट्रेड शो 4 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या काळात आयोजित केला जाणार आहे. हे डिव्हाईस स्मार्टफोन मार्केटमध्ये कधी लाँच केले जाणार, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती शेअर केली नाही. तसेच या डिझाईनचा वापर भविष्यात स्मार्टफोन तयार करण्यासाठी केला जाणार की नाही, याबाब देखील अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही.
सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर
गेल्या काही काळापासून स्मार्टफोन मेकर्स डिस्प्ले बॉर्डर्स कमी करण्यावर जास्त फोकस करत आहेत आणि अनेक फ्लॅगशिप डिव्हाईसमध्ये बरेच पातळ बेजल्स देखील पाहायला मिळत आहेत. टेक्नोची ही नवीनतम संकल्पना त्या दृष्टिकोनाला आणखी एका पुढच्या टप्प्यावर नेते आणि अशी रचना सादर करते, ज्यामध्ये विजिबल बॉर्डर पूर्णपणे काढून टाकण्यात आल्या आहेत. सध्या हे केवळ एक टेक्नोलॉजी डेमो आहे.

