Dailyhunt
Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव; जागतिक संकेतांचा परिणाम, घसरणीसह सुरुवात होण्याची शक्यता

Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव; जागतिक संकेतांचा परिणाम, घसरणीसह सुरुवात होण्याची शक्यता

  • गिफ्ट निफ्टी सुमारे १५९ पॉइंट्सने खाली असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे.
  • सोमवारी बाजार वाढीसह बंद झाला असून सेन्सेक्स ७७,२६९ आणि निफ्टी २४,११९ वर स्थिरावला.
  • तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांसाठी अनेक शेअर्समध्ये खरेदीची संधी सुचवली आहे.
India Share Market Update:५ मे रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे, जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास १५९ पॉइंट्सच्या सवलतीवर, २४,०४७ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

सोमवारी, भारतीय शेअर बाजार उच्चांकी पातळीपासून खाली येत वाढीसह बंद झाला, आणि बेंचमार्क निफ्टी ५० २४,१०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स ३५५.९० अंकांनी, म्हणजेच ०.४६ टक्क्यांनी वाढून ७७,२६९.४० वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२१.७५ अंकांनी, म्हणजेच ०.५१ टक्क्यांनी वाढून २४,११९.३० वर स्थिरावला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक १५.१५ अंकांनी, म्हणजेच ०.०३ टक्क्यांनी वाढून ५४,८७८.५० वर बंद झाला. (फोटो सौजन्य - AI Created)

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट, डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, मनप्पुरम फायनान्स आणि पॉलीकॅब इंडियाचे या शेअर्सची शिफारस केली आहे. निओट्रेडरचे सहसंस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आजस भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना पाच शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया , लोढा डेव्हलपर्स लिमिटेड, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड, लिंडे इंडिया लिमिटेड आणि जिंदाल स्टील लिमिटेड यांचा समावेश आहे.

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार एल अँड टी, एम अँड एम, हीरो मोटोकॉर्प, कोफोर्ज, टाटा टेक्नॉलॉजीज, मनाप्पुरम फायनान्स, इंडिगो, रिलायन्स इंडस्ट्रीज, दिल्लीवरी, वॉकहार्ट, जिंदाल स्टेनलेस, केईआय इंडस्ट्रीज, पेट्रोनेट एलएनजी या शेअर्सवर जास्त फोकस करू शकतात. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन शेअर्सची निवड केली आहे. त्यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये विशाल मेगा मार्ट, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, बेलराईज इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी ५ मे रोजी खरेदीसाठी पाच शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. त्यांनी सुचवलेल्या शेअर्समध्ये चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फिन कंपनी, नेस्को, शिवालिक बायमेटल कंट्रोल्स, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra