Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Summer Health Tips: कडाक्याच्या उन्हाळ्यात डोकेदुखीने हैराण झाला आहात? मग 'हे' घरगुती उपाय करून कायमचा मिळवा आराम

Summer Health Tips: कडाक्याच्या उन्हाळ्यात डोकेदुखीने हैराण झाला आहात? मग 'हे' घरगुती उपाय करून कायमचा मिळवा आराम

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. कडक ऊन, सतत बदलणारे वातावरण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बाहेरील वाढत्या तापमानामुळे कायमच डोकेदुखीचा त्रास होतो.

कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे केवळ थकवाचं नाहीतर डोकेदुखीचा त्रास सुद्धा वाढतो. बऱ्याचदा डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. उन्हामुळे वाढलेला डोकेदुखीचा त्रास संपूर्ण दिवसभर तसाच कायम राहतो. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर मेडिकलमधील गोळी आणून खाल्लली जाते. पण असे केल्यामुळे किडनीवर त्याचे परिणाम दिसू लागतात. त्यामुळे डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर हे घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य - istock)

Drinking Water: सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे का आहे फायदेशीर? जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण

डोके दुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय:

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. पाण्यासोबतच नारळ पाणी, ताक आणि इतर थंड पेयांचा आहारात समावेश करावा. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे नियमित ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय लिंबूपाणी, ताक, नारळपाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहण्यासोबतच तुम्ही कायमच फ्रेश आणि टवटवीत राहाल.

तापमानात वाढ झाल्यानंतर कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे. तसेच दुपारी १ ते ३ च्या दरम्यान उन्हातून कुठेही बाहेर जाऊ नये. उन्हाळ्यात बाहेर जात असाल तर सोबत टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा. याशिवाय सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून नियमित बाहेर जाताना सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. यामुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचा आणि आरोग्याचे कोणतेही नुकसान होत नाही.

स्मार्टफोनच्या व्यसनाने चिमुकल्यांच्या मेंदूवर होतोय गंभीर परिणाम, संशोधनात खुलासा; या वयोगटातील मुलं सर्वात जास्त असुरक्षित

उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर डोके दुखीचा त्रास चालू झाल्यास थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. तसेच वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्यात रुमाल बुडवून डोक्यावर घड्या ठेवाव्यात. यामुळे काहीवेळापुरते थंड वाटते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील आवश्यक घटक बाहेर पडून जातात. ते वाढवण्यासाठी पौष्टिक आहार आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय उष्णता वाढल्यानंतर सहज पचन होणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन करावे.तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन करू नये.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra