Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ

  • नव्या प्रोमोमध्ये चंपकचाचा अचानक गायब झाल्याने गोकुलधाममध्ये खळबळ उडते.
  • जेठालालला आलेल्या फोनमध्ये 'बापूजी गेले' असा धक्कादायक संवाद ऐकायला मिळतो.
  • या ट्विस्टमुळे सोशल मीडियावर यूजर्सनी मेकर्सवर टीका करत मालिकेच्या शेवटाची मागणी केली आहे.
लोकप्रिय टिव्ही शो तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ही लोकप्रिय मालिका आता एक वेगळे वळण घेणार असल्याचे सांगितलं जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमुळे केवळ गोकुलधाममधील रहिवाशांनाच नाही तर प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे.

Neetu Chandra ना शेअर केला नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंगसोबत काम करण्याचा अनुभव

चंपकचाच शो सोडणार का?

इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये चंपकचाचा म्हणजेच जेठालालचे बाबा (अमित भट्ट) हरवल्याचे समजते. यामुळे संपूर्ण सोसायटीमध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो. जेठालाल आणि टप्पू चंपकचाचा यांना संपूर्ण सोसायटीमध्ये शोधत असल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर हळूहळू संपूर्ण सोसायटी एकत्र येते आणि चंपकचाचा यांना शोधते. मात्र त्याचवेळी जेठालालला एक फोन येतो आणि या फोनमुळे सर्वांनाच धक्का बसतो. या प्रोमोमुळे आता चर्चा रंगली आहे की, गेल्या 18 वर्षांपासून सुरु असलेला चंपकचाचा यांचा प्रवास आता संपणार आहे का? चंपकचाचा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत का? प्रेक्षक आणि गोकुलधाम निवासी या सर्वांचे होश उडवून टाकणाऱ्या या प्रोमोमध्ये नेमकं काय आहे, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य - YouTube)

'तारक मेहता…' मध्ये जबरदस्त ट्विस्ट

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये एक अनोखा ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये पाहू शकता की, जेठालाल अस्वस्थ होऊन संपूर्ण सोसायटीमध्ये चंपकचाचा यांना शोधत असतो. जेठालाल तारक मेहता, हंसराज हाथी यांच्या घरी आणि संपूर्ण सोसायटीमध्ये चंपकचाचा यांना शोधत असतो. चिंतेची बाब म्हणजेच चंपकचाचा त्यांचा फोन देखील घरीच विसरलेले असतात. त्यामुळे त्यांना संपर्ण करणं अशक्य झालं आहे. भिडे, अय्यर आणि डॉ. हाथी या सर्वांच्या घरी विचारपूस केल्यानंतर देखील जेठालाल याला कोणतीही माहिती मिळत नाही. यामुळे जेठालालची चिंता आणखी वाढते.

शोधाशोध आणि धावपळ सुरु असतानाच जेठालाल एका व्यक्तीला फोन लावतो आणि विचारतो की, बापूजी तुमच्यासोबत आहे का? तेव्हा समोरील व्यक्ती रडत रडत उत्तर देतो की, 'बापूजी गेले… ते आम्हा सर्वांना सोडून गेले.' हे ऐकताच जेठालाल खाली कोसळतो आणि जोराजोरात ओरडू लागतो. या प्रोमोमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली असून, बापूजींचे पात्र संपणार आहे का, असा प्रश्न लोक विचारत आहेत.

नव्या प्रोमोमुळे यूजर्स भडकले

मेकर्सने प्रोमोमध्ये मृत्यूचा सस्पेंस दाखवल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्सनी असित कुमार मोदी आणि मेकर्सना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने म्हटलं आहे की, तोच जुनाच मार्ग पुन्हा पुन्हा गिरवणे. तर दुसरा यूजर म्हणाला आहे की, आता हा कार्यक्रम सन्मानाने संपायला हवा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra