Dailyhunt
Tamil Nadu Exit Poll 2026: DMK पुन्हा सत्तेत, तर अभिनेता विजय किंगमेकर? पाहा तमिळनाडू निवडणुकीचे आकडे

Tamil Nadu Exit Poll 2026: DMK पुन्हा सत्तेत, तर अभिनेता विजय किंगमेकर? पाहा तमिळनाडू निवडणुकीचे आकडे

  • DMK नेतृत्वाखालील आघाडीला पुन्हा सत्तेत येण्याचे मजबूत संकेत
  • MATRIZE च्या सर्वेनुसार DMK+ ला 122 ते 132 जागा, AIADMK+ ला 87 ते 110 जागा
  • पीपुल्स पल्स'च्या सर्वेतही DMK+ ला 125 ते 145 जागा, AIADMK+ ला 65 ते 80 जागा,

Tamilnadu Exit Poll News: तमिळनाडू विधानसभा निवडणुका 2026 संदर्भात 'टुडेज चाणक्य'ने गुरुवारी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार DMK नेतृत्वाखालील आघाडीला पुन्हा सत्तेत येण्याचे मजबूत संकेत मिळत आहेत. 234 सदस्यीय विधानसभेत DMK आघाडीला सुमारे 125 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेमधील विशेष बाब म्हणजे अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाला तब्बल 63 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. दुसरीकडे AIADMK नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सुमारे 45 जागांवर मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.

Nepal Accident: नेपाळमध्ये यात्रेकरूंनी भरलेली जीप 700 मीटर दरीत कोसळून 20 जणांचा मृत्यू; वैशाख पौर्णिमेच्या आनंदावर विरजण

इतर एक्झिट पोल्समध्ये वेगवेगळी चित्रे

तमिळनाडू निवडणुकांबाबत विविध संस्थांचे एक्झिट पोलही समोर आले असून, त्यामध्ये वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.

MATRIZE च्या सर्वेनुसार DMK+ ला 122 ते 132 जागा, AIADMK+ ला 87 ते 110 जागा, TVK ला 10 ते 12 जागा, तर इतरांना 0 ते 6 जागा मिळू शकतात.

'एक्सिस माय इंडिया'च्या एक्झिट पोलमध्ये मोठा उलटफेर दिसून येतो. या सर्वेनुसार TVK ला 98 ते 120 जागा मिळत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज आहे. DMK+ ला 92 ते 110 जागा, तर AIADMK+ ला 22 ते 32 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

P-MARQ च्या अंदाजानुसार DMK+ ला 125 ते 145 जागा, AIADMK+ ला 65 ते 85 जागा, TVK ला 16 ते 26 जागा आणि इतरांना 1 ते 6 जागा मिळू शकतात.

'पीपुल्स पल्स'च्या सर्वेतही DMK+ ला 125 ते 145 जागा, AIADMK+ ला 65 ते 80 जागा, TVK ला 18 ते 24 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

'मायलॉर्ड, ती कधीच आई होऊ शकणार नाही', 15 वर्षांच्या मुलीच्या गर्भपाताविरोधात AIIMSची बाजू; सुप्रीम कोर्ट म्हणाले,'आणि ती वेदना…'

'चाणक्य स्ट्रॅटेजीज'च्या एक्झिट पोलनुसार DMK+ ला 145 ते 160 जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. AIADMK+ ला 50 ते 65 जागा, तर TVK ला एकही जागा मिळणार नाही, असे या सर्वेत म्हटले आहे.

'पोल ऑफ एक्झिट पोल्स' काय सांगतो?

विविध एक्झिट पोल्सचा एकत्रित सरासरी अंदाज (Poll of Exit Polls) पाहता, मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील DMK आघाडी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सरासरीनुसार DMK+ ला सुमारे 130 जागा मिळण्याचा अंदाज असून, बहुमतासाठी आवश्यक 118 जागांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.

या सरासरीनुसार AIADMK+ ला सुमारे 66 जागा, TVK ला 32 जागा, तर इतर पक्षांना सुमारे 6 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra