Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

त्रपती संभाजीनगर : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता घराच्या बांधकामासाठी साहित्य घेऊन आलेल्या तरुणाला घरासमोरून वाहन नेत असल्याच्या कारणावरून अडवून त्याच्यासह त्याच्या आई- वडिलांना मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे.

ही घटना २८ जुलै राजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बंबाटनगरात घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. छाया कदम, बालाजी कदम, अर्जुन कदम आणि अन्य एक अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कल्पेश राजू सूर्यवंशी (वय २६, रा. बंबाटनगर, बीड बायपास) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या घराचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते छोटा हत्ती वाहनातून बांधकामाचे साहित्य घेऊन घरी जात होते. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या बालाजी कदम यांच्या घरासमोर उभी असलेल्या अल्टो कारजवळून वाहन नेत असताना छाया कदम यांनी वाहन थांबवून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करत इतरांना बोलावून घेतले. वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्यानंतर छाया कदम यांनी दगडाने कल्पेश सूर्यवंशी यांच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले.

वाद सोडविण्यासाठी आलेले त्यांचे वडील राजू सूर्यवंशी यांनाही दगडाने मारहाण करण्यात आली. तसेच बालाजी कदम, अर्जुन कदम आणि एका साथीदाराने कल्पेश, त्यांचे वडील व आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर जखमी पिता-पुत्रांनी उपचार घेतल्यानंतर पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून छाया कदम, बालाजी कदम, अर्जुन कदम आणि त्यांच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार डोंगरे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : रॅपिडो कंपनीच्या संचालकांवर संभाजीनगरात थेट गुन्हा दाखल! अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी आरटीओचा मोठा दणका

सिल्लोडमध्ये अज्ञात व्यक्तीचा गळा चिरून निघृण खून

सिल्लोडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिल्लोड शहरात बुधवारी (२९ जुलै) अज्ञात व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी आहे. त्याचा मृतदेह सिल्लोड-भोकरदन मार्गावरील एका पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीच्या संरक्षक भिंतीलगत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळावरून रक्ताने माखलेला कटर तसेच सुमारे ५०० ते ६०० ग्रॅम वजनाचा सिमेंटचा तुकडा जप्त केला आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध मार्गानी तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra