Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं. जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं. जाणून घ्या सविस्तर

  • स्टोरेज फुल झाल्यास स्मार्टफोनचा वेग कमी होऊन तो वारंवार हँग होऊ शकतो.
  • बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेली अनेक ॲप्स रॅम आणि प्रोसेसरवर ताण आणून फोन स्लो करतात.
  • हार्डवेअर समस्या किंवा जुनी बॅटरीही स्मार्टफोन हँग होण्यामागील महत्त्वाची कारणे ठरू शकतात.
प्रत्येत स्मार्टफोनयूजरला स्मार्टफोन हँग होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. काही यूजर्स स्मार्टफोन हँग होण्याच्या समस्येने हैराण होतात. जर स्मार्टफोन जुना असेल तर यूजर्सना वारंवार या समस्येचा सामना करावा लागू शकतो. हँग झाल्यास काहीवेळा फोन पूर्णपणे काम करणं बंद करतो. यादरम्यान यूजर्स ना कॉल उचलू शकतात ना कोणत्या ॲपचा वापर करू शकतात. जर एखाद्या अपात्कालीन परिस्थितीत फोन हँग झाला तर यूजर्सना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. स्मार्टफोन हँग होण्याामागे अनेक कारणं असू शकतात. याच कारणांबद्दल आता जाणून घेऊया. तसेच तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करून या समस्या सोडवू शकता. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

ही आहेत स्मार्टफोन हँग होण्याची कारणं

स्टोरेज फुल होणं

जर तुमच्या स्मार्टफोनचे स्टोरेज फुल्ल झाले असेल तर नवीन डेटा हँडल करणं आणि ॲप्स चालवणं कठीण होऊ शकतं. स्मार्टफोनमध्ये पुसेरे स्टोरेज नसेल तर फोनचे सिस्टिम सामान्य काम देखील पूर्ण करू शकत नाही. अशा परिस्थितीत सर्वात आधी फोनची स्पीड स्लो होते आणि अनेक कामं करताना फोन हँग होऊ शकतो. या समस्येपासून वाचण्यासाठी सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनचे स्टोरेज रिकामे करा. फोनमधील डुप्लीकेट फाइल्स, नको असलेले फोटो-व्हिडीओ आणि नको असलेले ॲप्स डिलीट करा. यामुळे फोनचे स्टोरेज रिकामे होईल आणि फोनची स्पीड देखील वाढेल. (फोटो सौजन्य: Pinterest)

बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटीचा होतो परिणाम

अनेक ॲप्स वापरानंतर देखील पूर्णपणे बंद होत नाही आणि बॅकग्राऊंडमध्ये सतत ॲक्टिव्ह असतात. बॅकग्राऊंडमध्ये सुरु असणारे हे ॲप्स स्मार्टफोनच्या बॅटरीसोबतच रॅमवर देखील परिणाम करतात. जर बॅकग्राऊंडमध्ये एकाच वेळी अनेक ॲक्टिव्हिटी सुरु असतील तर प्रोसेसवरील भार वाढू शकतो. अशावेळी जर तुम्ही स्मार्टफोनमध्ये मल्टी-टास्किंग किंवा कोणताही जड ॲप ओपन करण्याचा प्रयत्न करत असाल तर सिस्टिम प्रोसेस करण्यासाठी काही वेळ घेऊ शकते. अनेकदा फोन हँग होण्यासाठी बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी देखील कारणीभूत असू शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन ॲप्सच्या बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी लिमिटेड सेट करा.

Tech Tips: किती असतं Gaming Laptop चे आयुष्य? खरेदी करण्यापूर्वी वाचा सत्य, नाहीतर कराल पश्चाताप

हार्डवेयर समस्या

जुन्या फोनमध्ये बॅटरी, स्क्रीन आणि दूसरे कंपोनेंट खराब होऊ लागतात, ज्यामुळे फोनच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. जर बॅटरी कमकुवत झाली असेल तर बॅटरी स्थिर वीजपुरवठा करण्यास अडथळा आणू शकते. त्याचप्रमाणे, फोन पडल्यामुळे किंवा ओलाव्यामुळे अंतर्गत वायरिंग आणि कनेक्शन्सना देखील नुकसान होऊ शकते, ज्यामुळे फोनची कार्यक्षमता मंदावते. काही प्रकरणांमध्ये, दुरुस्ती करून या समस्या दूर होऊ शकतात, परंतु जर फोन अनेक वर्षे जुना असेल, तर तो बदलणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra