Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजी मंदिरात अखंड तेवतो 'हा' दिवा, काय आहे यामागील रहस्य जाणून घ्या

Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजी मंदिरात अखंड तेवतो 'हा' दिवा, काय आहे यामागील रहस्य जाणून घ्या

  • तिरुपती बालाजी मंदिरात अखंड तेवतो ‘हा’ दिवा
  • अखंड दिवा असण्यामागे काय आहे रहस्य
  • तिरुपती बालाजी मंदिराची काय आहेत वैशिष्ट्ये

आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर वसलेले तिरुपती बालाजी मंदिर हे भगवान श्री वेंकटेश्वरांचे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

दरवर्षी कोट्यवधी भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराशी संबंधित अनेक चमत्कार, परंपरा आणि लोकश्रद्धा प्रचलित आहेत. त्यापैकी एक म्हणजे मंदिरातील अखंड तेवत असलेला दिवा. या दिव्याबाबत भाविकांमध्ये प्रचंड श्रद्धा असून तो भगवान वेंकटेश्वरांच्या दिव्य उपस्थितीचे प्रतीक मानला जातो. तिरुपती बालाजी मंदिरात अखंड दिवा ठेवण्यामागे काय आहे रहस्य जाणून घ्या

वेंकटेश्वरांच्या कृपेचे दिव्य प्रतीक

श्री वेंकटेश्वर मंदिर अर्थातच श्री बालाजी तिरुपती मंदिरात अखंड दिवा आहे. या अखंड दिव्याबद्दल अनेक श्रद्धा आणि परंपरा प्रचलित आहे. लोकमान्यतेनुसार मंदिरातील अखंड ज्योती अनेक शतकांपासून तेवत आहे. या दिव्याला भगवान वेंकटेश्वरांच्या उपस्थितीचं आणि दैव्यी प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं.

Tirupati Temple Secrets: तिरूपती बालाजी मंदिराचे 5 मोठे रहस्य, देवाला का नेसवतात साडी-धोतर? वाचून व्हाल अवाक्

ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक

अनेक भक्तांचा विश्वास असा आहे की, हा दिवा कधीही विझलेला नाही. मंदिराच्या परंपरेनुसार गर्भगृहात दोन प्रमुख अखंड दीप आहे. हे दीप भगवान बालाजींच्या सेवेशी निगडीत असून मंदिरातील धार्मिक प्रेमींचा मुख्य भाग आहे. तिरुमल्लामध्ये मुख्य मंदिरासमोर अखिलांडम नावाचे एक स्थान आहे. येथे मोठे दिवे दिवसरात्र प्रज्वलित ठेवले जातात. भक्त येथे कापूर अर्पण करतात आणि नारळ फोडून प्रार्थना सुद्धा करतात. अखंड दिवा, दैव्यी प्रकाश आणि ज्ञानाच प्रतीक मानला जातो.

दैवी कृपेची अखंड ज्योत

भगवान वेंकटेश्वरांच्या अखंड कृपेचं चिन्ह म्हणून त्याकडे पाहिलं जातं. लाखो भाविक या ज्योतीला नमस्कार सुद्धा करतात. हा दिवा नेमका कधी प्रज्वलित करण्यात आला याची निश्चिक माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे तो तिरुपती मंदिरातील अनेक गुढ आणि अनेक चमत्कारांपैकी एक मानला जातो. तिरुपती बालाजी मंदिरातील अखंड दिवा हा केवळ एक ज्योत नाही आहे तर केवळ शेकडो वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धेचा आणि भगवान श्री वेंकटेश्वरांच्या अखंड कृपेचा प्रकाशमान प्रतीक आहे.

Sensitive Zodiac Sign: या राशींच्या व्यक्ती सहज दुखावल्या जातात; बाहेरून शांत, पण आतून अत्यंत संवेदनशील!

मंदिरातील इतर वैशिष्ट्ये

तिरुपती बालाजी मंदिर अनेक रहस्यांमुळे प्रसिद्ध आहे. भगवान वेंकटेश्वरांच्या मूर्तीवरील नैसर्गिक केस, मूर्तीचे नेहमी उबदार भासणारे स्वरूप, तसेच मंदिरातील काही प्राचीन परंपरा यांविषयी विविध लोकश्रद्धा प्रचलित आहेत. यामुळे या मंदिराचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra