Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजीचा लाडूचा प्रसाद का आहे खास, जाणून घ्या यामागील इतिहास

Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजीचा लाडूचा प्रसाद का आहे खास, जाणून घ्या यामागील इतिहास

  • तिरुपती बालाजीचा लाडूचा प्रसाद का आहे खास
  • 2009 मध्ये तिरुपती लाडूला GI Tag मिळाला
  • तिरुपती लाडू जगातील सर्वाधिक प्रसिद्ध मंदिर प्रसादांपैकी एक आहे.

आंध्र प्रदेशातील तिरुमला टेकडीवर वसलेले श्री तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.

येथे दररोज लाखो भाविक भगवान श्री वेंकटेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी येतात. दर्शनानंतर मिळणारा तिरुपती लाडू प्रसाद हा जगभर प्रसिद्ध असून, तो केवळ गोड पदार्थ नसून श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक भावनेचे प्रतीक मानला जातो. तिरुपती बालाजी मंदिरात मिळणारा लाडूचा प्रसाद इतका खास असण्यामागील काय आहे इतिहास ते जाणून घेऊया

कसा तयार केला जातो लाडू

प्राचीन काळी तिरुमल्ला मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फळ, पोंगल किंवा इतर नैवद्यांचा प्रसाद दिला जात असे. काळानुसार भाविकांची संख्या वाढत गेली. लाखो भाविकांना टिकाऊ सहज नेता येईल आणि सर्वांना समान प्रमाणात देता येईल असा प्रसाद आवश्यक होता. यासाठी बेसन, तूप, साखर, काजू, मनुका, वेलची आणि खडीसाखर वापरून एक विशेष लाडू तयार करण्यात आला. हा प्रसाद भाविकांना आवडला आणि हळूहळू तोच तिरुपतीची ओळख बनला.

Tirupati Balaji Temple: या कारणासाठी तिरुपती बालाजी मंदिरात सोने आणि पैसे केले जातात दान

मंदिरातील ‘पोटू’ या विशाल पारंपरिक स्वयंपाकघरात दररोज तयार होतात लाखो लाडू

अशी श्रद्धा आहे की, भगवान व्यंकटेश्वरांना गोड नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. भक्त प्रेमाने अर्पण केलेला नैवेद्य देवाला अर्पण झाल्यानंतर तोच प्रसाद बनतो आणि तोच भक्तांमध्ये वाटला जातो. तिरुपतीचा लाडू हा केवळ मिठाई नसून भगवंतांचा आशीर्वाद म्हणून भाविक घरी घेऊन जातात. अनेक जण तो कटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांमध्ये सुद्धा वाटतात. कारण प्रसाद वाटल्याने पुण्य आणि आनंद वाढतो अशी श्रद्धा आहे. मंदिराच्या परिसरात ‘पोटू नावाचं एक विशाल पारंपरिक स्वयंपाकघर आहे. येथे दररोज लाखो लाडू तयार केले जातात. अनुभवी कर्मचारी आणि पुजाऱ्याच्या देखरेखेखाली स्वच्छता, गुणवत्ता आणि पारंपरिक पद्धती यांची विशेष काळजी घेऊन हा लाडू तयार केला जातो.

2009 मध्ये तिरुपती लाडूला GI Tag (भौगोलिक मानांकन) प्राप्त

आजचा प्रसिद्ध तिरुपती लाडू हा प्रसाद इ.स. 1715 च्या सुमारास मंदिराचा नैवेद्य स्वरुपाचा भाग म्हणून नियमित स्वरुपात सुरू झाल्याची ऐतिहासिक नोंद सुद्धा आढळते. पुढे तो मंदिराची ओळख बनला. इतकंच नाही पुढे जाऊन 2009 मध्ये तिरुपती लाडू भौगोलिक मानांकन अर्थातच जीआय टॅक (GI Tag) मिळाल. त्यामुळे तिरुपती लाडू हे नाव आणि त्यांची पारंपरिक पद्धत ही संरक्षित झाली. इतरत्र बनवलेला लाडू हा या नावाने अधिकृतपणे आता विकता येत नाही.

Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजी मंदिरात अखंड तेवतो 'हा' दिवा, काय आहे यामागील रहस्य जाणून घ्या

तिरुपतीचा लाडू हा जगातील सर्वाधिक प्रमाणात तयार होणाऱ्या मंदिर प्रसादांपैकी एक

तिरुपतीचा लाडू इतका प्रसिद्ध का आहे तर त्याची चव आणि सुंगध अनेक दशकांपासून एकसारखी राखली गेली आहे. प्रसाद बनवण्यासाठी उच्च दर्जाचं साहित्य वापरलं जातं. प्रत्येक लाडू विशिष्ट वजन आणि प्रमाणानुसारच तयार केला जातो. तो मंदिरातील नैवेद्याचा भाग असल्यामुळे भाविकांसाठी त्याचे अध्यात्मिक महत्त्व अधिक आहे. दर्शनानंतर प्रत्येक भाविकाला एक लाडू दिला जातो. अनेक भाविक अतिरिक्त लाडूही खरेदी करतात. दररोज लाखो लाडूच वितरण होत असल्यामुळे तो जगातील सर्वाधिक प्रमाणात तयार होणाऱ्या मंदिराच्या प्रसादापैकी एक मानला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra