Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tirupati Balaji Temple: या कारणासाठी तिरुपती बालाजी मंदिरात सोने आणि पैसे केले जातात दान

Tirupati Balaji Temple: या कारणासाठी तिरुपती बालाजी मंदिरात सोने आणि पैसे केले जातात दान

  • तिरुपती बालाजी मंदिरात सोने आणि पैसे दान का केले जातात
  • तिरुपती बालाजी मंदिरात सोने आणि पैसे दान करण्यामागे काय कथा आहे
  • या मंदिरात केसदानालाही आहे विशेष महत्त्व

आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर वसलेले तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे.

दररोज लाखो भाविक भगवान श्री वेंकटेश्वरांच्या दर्शनासाठी येथे येतात आणि श्रद्धेने सोने, दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू दान करतात. अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की, तिरुपती बालाजी मंदिरात इतक्या मोठ्या प्रमाणावर दान का केले जाते? यामागील पौराणिक कथा जाणून घेऊया

बालाजींना सोने-पैसे अर्पण करण्यामागील श्रद्धा

तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर येथे विराजमान असलेले भगवान व्यंकटेश्वर अर्थातच बालाजी हे भगवान विष्णूंच रुप मानलं जातं. त्यांच्या संदर्भातील सर्वांत लोकप्रिय कथा ही कुबेरांच्या कर्जाशी आहे. एकदा महर्षी गुरूंनी देवांमध्ये श्रेष्ठ कोण हे पाहण्यासाठी परीक्षा घेतली त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवरती लाथ मारली विष्णूंनी रागावण्याऐवजी त्यांच्या पायाला लागले नाही ना अशी विचारपूस केली आणि हे पाहून देवी लक्ष्मी दुखी झाल्या आणि त्या वैकुंठ सोडून पृथ्वीवरती आल्या. लक्ष्मीच्या विरहामुळे विष्णूंनी पृथ्वीवरती अवतार घेतला ते तिरुमलाच्या पर्वतावरती श्रीनिवास या नावाने राहू लागले.

Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजी मंदिरात अखंड तेवतो 'हा' दिवा, काय आहे यामागील रहस्य जाणून घ्या

कुबेराचे कर्ज फेडण्यासाठी भक्त करतात दान

काही काळानंतर त्यांची भेट राजकन्या पद्मावतीशी झाली आणि दोघांनीही विवाहबद्ध होण्याचं ठरवलं. विवाह अत्यंत भव्य व्हावा म्हणून श्रीनिवासाने धनदेवता कुबेर यांच्याकडून मोठं कर्ज घेतलं. मात्र कुबेरांनी एक अट घातली की, कलियुग संपेपर्यंत हे कर्ज फेडावं लागेल. असं मानलं जातं की, आजही भक्त तिरुपतीमध्ये जो पैसं, सोनं किंवा इतर दान करतात ते भगवान बालाजीच कर्ज फेडण्यासाठीच. म्हणून तिरुपती मंदिराला दान करण्याला विशेष महत्त्व आहे.

श्रद्धा आणि समर्पणाचे प्रतीक

मंदिरात केले जाणारे दान हे केवळ आर्थिक अर्पण नसून भक्ताच्या श्रद्धा, कृतज्ञता आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. आपल्या उत्पन्नातील काही भाग देवाला अर्पण केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, अशी अनेकांची श्रद्धा आहे.

Shani Pradosh Vrat: शनिच्या साडेसातीमुळे त्रस्त आहात का? जाणून घ्या शनि प्रदोष व्रताची कथा

केसदानालाही विशेष महत्त्व

तिरुपतीमध्ये अनेक भक्त केसदान करतात. अहंकाराचा त्याग करून ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण व्यक्त करण्याचे हे प्रतीक मानले जाते. केसदानातून मिळणारे उत्पन्नही मंदिराच्या विविध उपक्रमांसाठी वापरले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra