Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला आणि हवेतच अडकला बकऱ्याचा जीव, प्राण्याचा आक्रोश अन् Rescue Video Viral

तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला आणि हवेतच अडकला बकऱ्याचा जीव, प्राण्याचा आक्रोश अन् Rescue Video Viral

  • मध्यरात्री इमारतीबाहेर जमलेल्या लोकांनी पाहिलं धक्कादायक दृश्य.
  • बकरी तिसऱ्या मजल्यावरुन पडून हवेतच लटकत होती.
  • काही तरुणांनी जीव धोक्यात घालून केलं थरारक बचावकार्य.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगेवगळ्या घटनांचे व्हिडिओजशेअर केले जातात.
आता मात्र इथे एका बकऱ्याच्या रेस्क्यूचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन बकरा खाली पडला ज्यानंतर थरारक दृष्य व्हिडिओत दिसले. आपल्याला कुणीतरी वाचवावं आणि या परिस्थितीतून बाहेर काढावं यासाठी बकऱ्याने आक्रोश करायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये काही लोक रश्शीच्या मदतीने बकऱ्याचा जीव वाचवताना दिसले. घटना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील काैसा या ठिकाणी घडली. चला नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

हवेतच जीवाचा थरार! विमानाची जोरदार धडक, आकाशातच पॅरोशूट फाटलं अन् महिलेचा जीव मृत्यूच्या सापळ्यात अडकला; Video Viral

नक्की काय घडलं?

सोशल मिडियावर अलिकडेच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एक बकरा हवेतच लटकताना दिसला. आपला जीव वाचवण्यासाठी तो ओरडून लोकांना सांगत होता की मला वाचवा. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ठाणे जिल्ह्यातील काैसा येथील अलमास कॉलोनीमध्ये रात्रीच्या सुमारास घडून आली. लोकांना अचानक बकरीच्या किंकाळ्या ऐकू आल्या ज्यानंतर लोकांनी घराबाहेर येऊन नक्की काय घडलं हे पाहण्यासाठी गर्दी केली. बकरी हवेतच लटकून मृत्यूच्या जाळ्यात अडकली होती, ती खाली पडली तर तिचा मृत्यू निश्चित होता पण वेळीच इमारतीच्या युवकांनी मिळून तिचे बचावकार्य सुरु केले. दोरीच्या मदतीने बकरीला पकडून खूप प्रयत्नांनंतर, त्या मुक्या प्राण्याचा जीव अखेर वाचला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत असून यूजर्सने बकरीचा जीव वाचवणाऱ्या युवकांचे काैतुक केले आहे.

यमराजांचा जावई जणू…! व्यक्तीने कचऱ्यापासून तयार केली सर्वात भयानक बाईक, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

या जगात प्रत्येकाचा जीव हा मोलाचा आहे, मग तो माणूस असो वा प्राणी… आपल्या बळाचा वापर करुन आपण कुणाचा तरी जीव वाचवू शकतो किंवा कुणाची मदत करु शकतो ही भावना सुखद आहे. बकरीच्या रेस्क्यूनंतर संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी युवकांचे अभिनंदन केले आणि यासोबतच त्यांच्या धैर्याचे आणि दयाळूपणाचे काैतुकही करण्यात आले. घटनेचा व्हिडिओ @save_our_strays_of_mumbra नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, "म्हणूनच, सोसायट्यांमध्ये बकऱ्या आणण्यावर बंदी घातली पाहिजे!", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "बळी देण्यापूर्वी, बकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्या तरुणाने बकऱ्याला वाचवले." आणखीन एका युजरने लिहिले आहे, "बकरी जीव वाचवण्यासाठी पळत होती, पण पकडली गेली".

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra