Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Toyota Fortuner India: नवीन-जनरेशन टोयोटा फॉर्च्युनरचे भारतात आगमन! पाहा काय असेल खास

Toyota Fortuner India: नवीन-जनरेशन टोयोटा फॉर्च्युनरचे भारतात आगमन! पाहा काय असेल खास

  • नवीन डिझाइन व फीचर्स:नव्या फॉर्च्यूनरमध्ये हायलाइक्ससारखी ग्रिल, १२.३-इंच स्क्रीन, ३६०-डिग्री कॅमेरा आणि सेफ्टीसाठी ADAS तंत्रज्ञान मिळण्याची दाट शक्यता आहे.
  • स्टिअरिंग व केबिन अपडेट: यात सध्याच्या हायड्रॉलिकऐवजी नवीन इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंगसह सुधारित डॅशबोर्ड आणि व्हेरियंट्सनुसार व्हेंटिलेटेड सीट्सचे पर्याय मिळू शकतात.
  • लाँचिंग व संभाव्य किंमत: ही दमदार SUV २०२७ च्या मध्यापर्यंत लाँच होऊ शकते, तसेच अपडेट्समुळे तिची किंमत ₹८०,००० ते ₹१.५ लाखांनी वाढू शकते.

टोयोटाने नुकताच भारतात आपला नवा हायलक्स लाँच केला आहे. त्यानंतर आता कंपनी याच बदलांसह फेमस SUV फॉर्च्यूनरचे अपडेटेड व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. पण नव्या फॉर्च्यूनरमध्ये फक्त बाहेरूनच बदल असतील की काही नवीन फीचर्सही मिळतील? या सर्व गोष्टी इथे आज आपण समजून घेऊयात.

काय बदलण्याची शक्यता आहे?

टोयोटा फॉर्च्यूनर आणि हायलक्स मध्ये अनेक समानता आहेत. दोन्ही गाड्या एकाच लॅडर-ऑन-फ्रेम प्लॅटफॉर्मवर आधारित असून, त्यांचे ऑफ-रोडिंग फीचर्स आणि इतर उपकरणे सारखीच आहेत. त्यामुळे नव्या जनरेशनच्या फॉर्च्यूनरचा पुढचा भाग नव्या हायलक्स सारखाच दिसण्याची शक्यता आहे.

गाडीचे बाह्य स्वरूप

नव्या फॉर्च्यूनरमध्ये नवीन हॅनीकॉम्ब-स्टाईल ग्रिल, नवीन हेडलाइट्स आणि टेललाइट्स, बदललेले बंपर आणि नवीन अलॉय व्हील्स मिळण्याची अपेक्षा आहे. बाहेरून अनेक बदल दिसणार असले, तरी गाडीचा मूळ आकार आणि साईजमध्ये कोणताही मोठा बदल होणार नाही.

लुकमध्ये खतरनाक अन् थारपेक्षाही भारी; पाहा Chery iCar V25 चा जलवा! लवकरच मार्केटमध्ये येण्याची शक्यता

इंटेरियर आणि नवीन फीचर्स

हायलक्सच्या केबिनमध्ये नवीन डॅशबोर्ड आणि नवीन स्टिअरिंग व्हील देण्यात आले आहे. परंतु हायलक्स हे भारतातील टोयोटाचे मुख्य प्रॉडक्ट नसल्यामुळे त्यात जास्त फीचर्स वाढवून किंमत वाढवणे टोयोटाने टाळले आहे खरे. मात्र, फॉर्च्यूनरच्या बाबतीत कंपनी हीच रणनीती ठेवणार नाही असे दिसून येते.

फॉर्च्यूनर ही भारतातील सर्वात लोकप्रिय फुल-साईज SUV असल्यामुळे टोयोटा तिच्या बेस आणि लोअर व्हेरियंट्समध्येही अनेक नवीन फीचर्स देण्याचा प्रयत्न करेल.

नवीन डॅशबोर्ड आणि स्टिअरिंग

नव्या मॉडेलमध्ये री-डिझाइन केलेला डॅशबोर्ड आणि सध्याच्या हायड्रॉलिक युनिटऐवजी नवीन इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग मिळू शकते.

मोठा डिस्प्ले आणि ३६०-डिग्री कॅमेरा

सध्याच्या ८-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टरऐवजी नवीन १२.३-इंच युनिट्स दिले जाऊ शकतात.अॅक्सेसरी म्हणून देण्याऐवजी कंपनी आता फॅक्टरी-फिटेड ३६०-डिग्री कॅमेरा देऊ शकते.

Mahindra XUV 3XO चे बेस व्हेरिअंट घरी आणायचा प्लॅन करताय? 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल ईएमआय? जाणून घ्या

व्हेंटिलेटेड सीट्स आणि सुरक्षा

सध्या फक्त ४×४ व्हेरियंट्समध्ये मिळणारे व्हेंटिलेटेड सीट्सचे फीचर आता खालच्या व्हेरियंट्समध्येही उपलब्ध केले जाऊ शकते. सुरक्षेच्या दृष्टीने नव्या फॉर्च्यूनरमध्ये ADAS मिळण्याची दाट शक्यता आहे. यात लेव्हल-२ क्षमता असेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लाँचिंग आणि अपेक्षित किंमत

टोयोटाने अद्याप नवीन जनरेशनच्या फॉर्च्यूनरच्या लाँचिंगच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केलेली नाही. मात्र, ही अपडेटेड टोयोटा फॉर्च्यूनर २०२७ च्या मध्यापर्यंत ते २०२८ च्या सुरुवातीच्या आत लाँच होण्याची शक्यता आहे.

  • सध्याची किंमत: मुंबईत सध्याच्या फॉर्च्यूनरची ऑन-रोड किंमत सुमारे ₹४१.६३ लाख ते ₹६२.४७ लाख दरम्यान आहे.
  • अपेक्षित वाढ: नवीन फीचर्स आणि अपडेट्समुळे व्हेरियंटनुसार किंमतीत ₹८०,००० ते ₹१.५ लाखांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra