Dailyhunt
Traffic Jam: सलग सुट्ट्यांचा फटका! मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या

Traffic Jam: सलग सुट्ट्यांचा फटका! मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या

  • सलग सुट्ट्यांचा फटका!
  • मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
  • खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या
Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत. दोन तासांपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोडींनिर्माण झाली. याचा फटका लोकांना बसत आहे. मुंबई ते पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लेनमध्ये समस्या निर्माण झाली आहे. सलग तीन वेळा वाहतूक थांबल्याने मुंबईकर मोठ्या संख्येने लोणावळ्याच्या दिशेने निघाले आहेत. सकाळी वाहतूक हळूहळू सुरू झाली होती. मात्र, आता दोन तासांहून अधिक काळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. विकेंडमुळे एक्सप्रेसवर वाहनांच्या लांबच लांब रागा बघायला मिळत आहेत. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहतूक कोंडी आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांचा पुणे लेनवर पंधरा मिनिटांचा ब्लॉक आहे. मात्र, वाहतूक काही सुरळीत होत नाही.

Maharashtra Legislative Council Elections 2026 : महाविकास आघाडीतला तणाव चर्चेनंतर अखेर निवळला

खासदार सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठा वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. या वाहतूक कोडींत सुप्रिया सुळे गेल्या दोन अडकून बसल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी काही व्हिडीओही तयार केली आहेत. सुप्रिया सुळे व्हिडीओमध्ये मी दोन तासांपासून वाहतूक कोडींत अडकल्याचे सांगताना दिसत आहेत. शिवाय त्या शेजारी असलेल्या वाहनचालकांनाही गप्पा मारत आहेत.

तर दुसरीकडे १ मे, महाराष्ट्र दिनी, राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. हा प्रकल्प मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास केवळ अधिक जलद आणि सुरक्षित करणार नाही, तर महाराष्ट्राच्या आधुनिक अभियांत्रिकी क्षमतेचे एक प्रमुख उदाहरण म्हणूनही ओळखला जातो. प्रकल्प पूर्ण झाल्यावर, मुंबई आणि पुणे दरम्यानच्या प्रवासाचा वेळ अंदाजे २५ ते ३० मिनिटांनी कमी होईल. सध्या, घाट विभागातील वाहतूक कोंडी, तीव्र वळणे आणि तीव्र चढावांमुळे वाहनांचा वेग मंदावतो. 'मिसिंग लिंक' प्रकल्प या समस्यांचे निराकरण करेल.

महाप्रकल्प महाराष्ट्राची नवी ओळख बनत आहेत

गेल्या काही वर्षांत, महाराष्ट्रात अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने विकसित करण्यात आले आहेत. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू आणि आता मुंबई-पुणे मिसिंग लिंक यांसारखे प्रकल्प राज्याला एका आधुनिक वाहतूक जाळ्याच्या दिशेने पुढे नेत आहेत. या प्रकल्पांमुळे उद्योग, व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळेल, असा सरकारचा दावा आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज हजारो वाहनांची ये-जा पाहता, हा प्रकल्प आर्थिक घडामोडींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Pratap Sarnaik : भाईंदरपाडा जमीनीचा वाद चिघळला; सरनाईक-मेहता पुन्हा आमनेसामने, विहंग ग्रुपकडून मेहतांना 'Cease & Desist' नोटीस

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra