Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

  • महाराष्ट्रात पर्यटनाचा एक नवीन आणि वेगळा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे.
  • शहरांपासून दूर शांत ठिकाणी निसर्गाचा खास अनुभव घेण्याची संधी मिळते.
  • योग्य वेळ आणि हवामान निवडल्यास हा अनुभव अधिक रोमांचक ठरू शकतो.
फिरणंम्हटलं की आपल्या मनात सर्वात पहिले समुद्रकिनारे, किल्ले किंवा राजवाडे या गोष्टी येतात. पर्यटन हे फक्त निवडक स्थळांसाठीच लोकप्रिय नसून तुम्ही अनेक प्रकारे पर्यटनाचा आनंद लुटु शकता. मागील काही काळापासून पर्यटनाचे अनेक नवनवीन ट्रेंड्स समोर आले आहेत. अशात त्याच त्याच ठिकाणांना भेट देण्याऐवजी तुम्ही काही नवीन ठिकाणांचे साैंदर्य पाहू शकता. महाराष्ट्र सरकारने खगोल पर्यटन नावाचा एक नवीन आणि वेगळा अनुभव आणला आहे. यात तुम्हाला ताऱ्यांखाली फिरण्याची मजा लुटता येते. याअंतर्गत, राज्यात अशी ११ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत जी तुम्हाला निरभ्र आणि गडद आकाशात सुंदर चमकणारे तारे पाहण्याची संधी मिळवून देते. याला डार्क स्काय टुरुझम असेही म्हटले जाते. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, सरकार या ठिकाणी प्रकाश प्रदूषण कमी करेल, जेणेकरून आकाश स्पष्टपणे दिसेल आणि लोकांना खगोलशास्त्राचा अधिक चांगल्या प्रकारे अनुभव घेता येईल.

अचानक दोन भागांत विभागला जातो हा समुद्र, लोकांना जाण्यासाठी तयार करतो रस्ता; हैराण करते इथले दृष्य

एस्ट्रो-टूरिझम नक्की काय आहे?

एस्ट्रो-टूरिझम म्हणजे अशा ठिकाणांना भेट देणे जिथे कोणत्याही अडथळ्याशिवाय रात्रीचे सुंदर तारे, आकाश आणि ग्रह टेलिस्कोपच्या साहाय्याने पाहता येतात. याच्या मदतीने खगोलशास्त्र आणखी जवळून पाहता येतं. या प्रकारचं पर्यटन तुम्हाला नक्कीच एक वेगळ नवा अनुभव देऊन जाईल जो मनाच्या कोपऱ्याच नेहमी साठवून येईल. हे पर्यटनाचे एक नवीन रूप आहे, जिथे लोक फक्त फिरायला न जाता अवकाशाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतात.

महाराष्ट्रातील प्रमुख खगोल-पर्यटन स्थळे

  • पेंच वाघ अभयारण्य
  • हरिहरेश्वर
  • लोणार विवर तलाव
  • ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य
  • भंडारदरा
  • नाशिकजवळील उदमल गाव
ही सर्व ठिकाणे शहरांच्या गजबटापासून दूर आहेत. इथे प्रकाश कमी असतो आणि आकाश निरभ्र असते. याचाच अर्थ तारे पाहण्यासाठी या ठिकाणांची निवड सर्वोत्तम ठरते.

झपाट्याने वाढत आहे नवा ट्रेंड

मागील काही काळापासून या नव्या ट्रेंडचा प्रभाव चांगलाच वाढला आहे. तरुण पिढी आता त्याच त्याच ठिकाणांना सोडून काही नवीन पाहण्याच्या शोधात असते ज्यामुळे लोकांमध्ये या ट्रेंडची चर्चा वाढत चालली आहे. लडाखमधील खगोलशास्त्र निरीक्षण केंद्र हे याचे उत्तम उदाहरण आहे, जिथे पर्यटक अत्याधुनिक दुर्बिणींच्या साहाय्याने रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करतात.

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

प्रवासाचे नियोजन करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

जर तुम्ही एस्ट्रो टुरिझम करण्याची योजना आखत असाल तर त्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं फार गरजेचं ठरतं. यासाठी हवामान निरभ्र असावे, दाट ढग असतील तर सर्व मजा खराब होऊ शकते. अमावस्येच्या वेळी आकाश गडद असते याकाळात तुम्ही ग्रह-ताऱ्यांची मजा लुटु शकता. कमी प्रदुषण आणि शहरांपासून दूर असलेले ठिकाण यासाठी निवडा. टेलिस्कोप आणि गाईडेड टूरची संधी मिळाली तर नक्की त्याची निवड करा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra