Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Trump on Khamenei Funeral : ' आम्ही आठवड्याभराची मुभा दिली' ; खामेनेईंच्या अंत्यसंस्कारावरुन ट्रम्प यांनी उडवली इराणची खिल्ली

Trump on Khamenei Funeral : ' आम्ही आठवड्याभराची मुभा दिली' ; खामेनेईंच्या अंत्यसंस्कारावरुन ट्रम्प यांनी उडवली इराणची खिल्ली

  • इराणला आठवड्याभराची मुभा आम्हीच दिली
  • खामेनेईंच्या अंत्यसंस्कारावरुन ट्रम्प टोला
  • पेटला नवा वाद
Trump on Khamenei Funeral News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात झाली आहे.
अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर निशाणा साधला आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नेमकं काय म्हणाले ट्रम्प"color: #3366ff;">Khamenei Funeral : खामेनेईंसह त्यांच्या कुटुंबालाही अखेरचा निरोप; 14 महिन्यांच्या चिमुकलीची शवपेटी पाहून लोक गहिवरले

काय म्हणाले ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाल इराणवर टीका केली. त्यांनी दावा केला , अमेरिकेच्या कारवाईनंतर इकराणवर दबाव आला आहे. यामुळे आता ते चर्चेसाठी आणि करारासाठी उत्सुक आहेत. तसेच त्यांनी खामेनेईंच्या अंत्यसंस्कारावरुनही वादग्रस्त विधान केले.

ट्रम्प यांनी म्हटले, आम्ही अंत्यसंस्कारासाठी इराणला एक आठवड्याची मुदत दिली आहे, कारण आम्ही चांगले आहोत. सध्या त्यांच्या या उरोधिक टीकेवर जगभरात चर्चा सुरु आहे.

तब्बल १३१ दिवसानंतर होणार खामेनेईंचा दफनविधी

०४ जुलै पासानू खामेनेईंच्या अंत्यंस्काराला सुरुवात झाली आहे. त्यांच्या मृतदेह सध्या तेहरानमधील ग्रँड मोसल्ला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर मृत सदस्यांच्याही शवपेट्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे त्यांची १४ महिन्यांची नातीची शवपेटीही आहे.

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायली हल्ल्यात खामेनेईंसह त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि नातीचाही मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या १३१ दिवसानंतर दफनविधी केला जात आहे. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुले हा सोहळा पुढे ढकलण्यात आला होता.

मोजतबा खामेनेई उपस्थित राहणार नाहीत

या हल्ल्यात खामेनेई यांचे धाकटे सुपुत्र मोजतबा खामेनेई बचावले. त्यांना हल्ल्यात गंभीर दुखापत झाली असून ते सध्या गुप्त ठिकाणी उपचार घेत आहे. त्यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. परंतु ते सार्वजनिकरित्या अद्याप समोर आलेले नाही. खामेनेईंच्या अंत्यसंस्कारालाही ते उपस्थित राहणार नाही. सध्या मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.

Khamenei Funeral : जगाचे लक्ष तेहरानकडे! खामेनेईंना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंची गर्दी; इराणच्या बड्या नेत्यांचे पाणावले डोळे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra