Dailyhunt
Trump Putin Talk : युद्ध थांबणार? ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवर प्रदीर्घ चर्चा; इराण युद्धविरामाबाबत मोठे भाष्य

Trump Putin Talk : युद्ध थांबणार? ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवर प्रदीर्घ चर्चा; इराण युद्धविरामाबाबत मोठे भाष्य

  • ट्रम्प पुतिन यांच्या ९० मिनिटं फोनवरुन चर्चा
  • इराण युद्धविरामावर काय बोलले?
  • युक्रेनचे भविष्य ट्रम्प यांच्या हातात?
Donald Trump and Vladimir Putin Phone Call : वॉशिंग्टन/मॉस्को : सध्या अमेरिका इराण युद्धा (US Iran War) मुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशांमधील शांतता चर्चा ठप्प असून तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दरम्यान जगातील दोन बलाढ्य नेते ट्रम्प आणि पुतिन यांनी फोनवरुन संवाद साधला आहे. या संवादाने सध्या जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या संवादादरम्यान इराण युद्धविराम आणि युक्रेन संघर्षावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

US Iran Conflict : भारतीय जहाजांचा होर्मुझमध्ये रस्ता रोखणार? इराणी राजदूतांनी स्पष्टचं सांगितलं; चाबरहारवर मोठे भाष्य

नेमकी काय चर्चा झाली?

इराण युद्धावर गुप्त चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये संवादादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण आणि जागतिक मुद्दांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये इराण युद्धविराम आणि इराणचा अणु कार्यक्रम, मध्यपूर्वेतील प्रादेशिक स्थिरता हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत युद्धविराम लागू करण्यासाठी रशियाने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले. तर पुतिन यांनी इराणच्या अणू कार्यक्रमाबाबत काही ठोस मुद्दे मांडले. तसेच तणाव कमी करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांचे समर्थन केले. पण अणु कार्यक्रमावर नेमकी काय चर्चा झाली याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

युक्रेन युद्धावरही मोठा निर्णय

याच दरम्यान ट्रम्प यांनी युक्रेन युद्धही लवकर संपले अशी आशा व्यक्त केली. मात्र पुतिन यांनी युक्रेनवर दहशतीचा मार्ग वापरल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी युक्रेनविरोधात आपली आक्रमक भूमिका काय ठेवली. दरम्यान व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी युद्धविरामाचा नवीन प्रस्ताव मांडला असून यावर ट्रम्प यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. हे पाऊल दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी आणि भविष्यातील जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

ट्रम्पवरील हल्ल्यावर पुतिन यांचा संताप

संवादादरम्यान पुतिन यांनी ट्रम्प यांच्यावर वॉशिंग्टन येथे झालेल्या गोळीबारावरही भाष्य केले. हिल्टन हॉलेलमध्ये झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा पुतिन यांनी तीव्र विरोध केला. ट्रम्प यांनी एका ३१ वर्षीय व्यक्तीने मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सुरक्षा दलांच्या तातडीच्या कारवाईमुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला.

याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये भविष्यातील आर्थिक आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्यावरही चर्चा झाली. रशिया आणि अमेरिका यांच्यातील संवाद जागतिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. रशियाच्या क्रेमलिननेही या चर्चेला मैत्रीपूर्ण आणि प्रभावी म्हटले आहे.

Explainer : इराणशी युद्धात अमेरिकेची Exit रणनीती! विजयाची घोषणा करुन युद्धाचे मैदान सोडणार ट्रम्प?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra