Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Trump-Netanyahu Meet : 'त्यांना माहितीय, Boss कोण आहे' ; नेतन्यांहूशी भेटीपूर्वी ट्रम्प यांचे खळबळजनक विधान

Trump-Netanyahu Meet : 'त्यांना माहितीय, Boss कोण आहे' ; नेतन्यांहूशी भेटीपूर्वी ट्रम्प यांचे खळबळजनक विधान

  • नेतन्यांहूशी भेटीपूर्वी ट्रम्प यांचे खळबळजनक विधान
  • जाणून घ्या काय म्हणाले ट्रम्प?
  • दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं कोणत्या कारणावरुन मतभेद?
Trump-Netanyahu Meet News in Marathi : वॉशिंग्टन/जेरुसलेम : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या इराणवरुन वादाची ठिणगी पडली आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये इराणवरील हल्ल्यांवरुन मतभेद निर्माण झाले आहेत. नेतन्याहूंनी अमेरिका-इराण शांतता कराराला तीव्र विरोध केला आहे. तर ट्रम्प यांनी त्यांना संयम बाळगण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांची लवकरच अमेरिकेच्या व्हाईट हाउसमध्ये भेट होण्याची शक्यता आहे. पण या भेटीपूर्वीच ट्रम्प यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

PM Modi Threat : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी PM मोदींना जीवे मारण्याची धमकी? मेलबर्नमधील कार्यक्रमात घातपाताची शक्यता, तपास सुरु

काय म्हणाले ट्रम्प ?

डोनाल्ड ट्रम्पयांनी एका मुलाखतीदरम्यान इस्रायल-अमेरिकेचे संबंध चांगले असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी नेतन्यांहूवर निशाणा साधत, त्यांना माहित आहे, बॉस कोण आहे. असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानांनतर दोन्ही नेत्यांमधील मैत्रीबाबत चर्चा रंगली आहे.

ट्रम्प यांनी असाही दावा केला, नेतन्याहूंनीच त्यांना व्हाईट हाऊसमध्ये भेटीसाठी विनंती केली होती. येत्या काही दिवसात ही बैठक होणार आहे, परंतु अद्याप तारिख निश्चित करण्यात आलेली नाही. इस्रायलकडूनही ट्रम्प-नेतन्याहूंच्या भेटीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा?

मीडिया रिपोर्टनुसार, या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये इराणशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. सध्या मध्यपूर्वेतील सुरक्षा परिस्थितीवर आणि लेबनॉनमधील संघर्षावरही या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय अमेरिका-इस्रायलमधील धोरणात्कम सहकार्याचाही आढावा घेतला जाईल.

इराण-लेबनॉनवरुन मतभेद

गेल्या काही आठवड्यांपूर्वी इराण आणि लेबनॉनच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये मतभेत निर्माण झाले आहे. ट्रम्प यांना मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा आहे. मात्र, नेतन्याहूंनी यांच्या लेबनॉनवरील आक्रमक भूमिकेमुळे यामध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. यामुळे सध्या या बैठकीकेड संपूर्ण जगाचे लक्ष लागल आहे.

इराणला सतर्कतेचा इशारा

ट्रम्प यांनी इराणबाबतही मुलाखतीत भाष्य केले. त्यांनी इराणला पुन्हा चर्चेसाठी तयार असल्याचा दावा केला. तसेच ट्रम्प यांनी इराणला अमेरिकेने खामेनेईंच्या अंत्यसंस्कारासाठी एक आठवड्याची मुदत दिली असल्याचे म्हटले. त्यांच्या या विधानामुळे तणाव चिघळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुप्तपणे सतर्क राहण्याचाही इशारा दिला आहे.

त्यांनी दावा केला आहे की, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व इराणी नेते जमा झाले असून त्यांच्यावर इस्रायलकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील मित्र देशांच्या मदतीने ही माहिती इराणपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. परंतु अद्याप इराणकडून किंवा इस्रायलकडून कोणत्याही अशा हल्ल्याबाबत संकेत मिळालेले नाहीत.

तुर्कीचा मोठा निर्णय! LGBTQ+ पर्यटकांच्या क्रूझला बंदरावर प्रवेश नकारला; कारण काय ?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra