Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन खाऊन जिवंत राहतात हे सूक्ष्मजीव, आता मानवी शरीराचा बनू पाहतायेत भाग; संशोधनातून धक्कादायक खुलासा

तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन खाऊन जिवंत राहतात हे सूक्ष्मजीव, आता मानवी शरीराचा बनू पाहतायेत भाग; संशोधनातून धक्कादायक खुलासा

  • चेहऱ्यावरील डेड स्किनवर जगणाऱ्या माइट्समध्ये अनोखे जैविक बदल आढळल्याचा संशोधनातून दावा.
  • हे सूक्ष्मजीव मानवी त्वचेशी अधिक जुळवून घेत असल्याचे संशोधकांचे निरीक्षण.
  • त्वचेच्या पोर्स स्वच्छ ठेवण्यात या माइट्सची उपयुक्त भूमिका असू शकते, असे तज्ज्ञांचे मत.
तुम्हाला माहिती नसेल पण मानवी त्वचेवरनेहमीत अनेक सूक्ष्मजीवांचे वास्तव असते. या रहस्यमयी जीवांना माइट्स किंवा डेमोडेक्स फोलिकुलोरम असेही म्हटले जाते. हे सूक्ष्मजीव तुमच्या केसांच्या मुळांमध्ये उलटे लटकलेले असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण हे सूक्ष्मजीव मानवी त्वचेवरच जन्म घेतात आणि इथेच मरतात. त्यांचे संपूर्ण आयुष्य आपल्या त्वचेवर सुरु असते. त्वचेवरील डेड स्किन खाऊन ते जगतात. दरम्यान हे सूक्ष्मजीव आता वेगाने बदलत असून ते स्वत:मध्ये वेगळे बदल घडवत असल्याचा खुलासा नव्या संशोधनात करण्यात आला आहे. यानुसार ते आता एक्टोपॅरासाइटमधून इवॉल्व्ह होऊन पूर्णपणे ऑब्लिगेट सिम्बायोंट बनत आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर, हळूहळू हे जीव मानवी शरीराशी एकरुप होऊ पाहत आहेत.

Travel News : व्हेकेशनहून किती वेगळा आहे स्टेकशन? तरुणांमध्ये का वाढत आहे क्रेझ…

नव्या संशोधनात, वैज्ञानिकांनी या सूक्ष्मजीवांच्या जीनोमची डीप सिक्वेंसिंग केली. परंतु संशोधनाचा जेव्हा रिझल्ट समोर आला तेव्हा त्याने संपूर्ण जगाला थक्क करुन सोडलं. मानवांवर अवलंबून असल्याने या सूक्ष्मजीवांमध्ये अनेक बदल घडून आल्याचे दिसले. यात इव्होल्यूशनचे काही असे हैराण करणारे बदल होते ज्यांचा खुलासा आजवर कधीच झाला नाही. रीडिंग विद्यापीठातील एक प्रख्यात संशोधक, अलेजांद्रा पेरोटी यांनी सांगितले की, “त्वचेच्या छिद्रांमध्ये सुरक्षितपणे राहिल्यामुळे या जीवांच्या डीएनएमध्ये अनेक असामान्य बदल झाले आहेत.” चेहऱ्याच्या छिद्रांमध्ये वर्षानुवर्षे सुरक्षितपणे राहिल्यामुळे त्यांच्या शरीराच्या अवयवांची रचना देखील पूर्णपणे बदलली आहे.

हे जीव रिप्रोडक्शन कसे करतात?

  • हे माइट्स आपल्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन नाही बनवू शकत. मानवामध्ये, हे हार्मोन रात्रीच्या झोपेचे चक्र नियंत्रित करण्यास मदत करते. मात्र, लहान प्राण्यांमध्ये हे हार्मोन हालचाल आणि प्रजननासाठी अत्यावश्यक असते.
  • हे हार्मोन नसले तरी या जीवांना कोणत्याही मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत नाही. संशोधनानुसार, हे सूक्ष्मजीव संध्याकाळच्या वेळी मानवी त्वचेतून निघणाऱ्या मेलाटोनिनचा वापर करतात.
  • इतर जीवांप्रमाणे नसून, या सूक्ष्मजीवांचे प्रजनन अवयव शरीराच्या पुढच्या भागात सरकलेले आहेत. नर माइट्सचा प्रायव्हेट पार्ट त्यांच्या पाठीपासून पुढे आणि वरच्या दिशेला वळलेला असते. यामुळे त्यांना मिलनाच्या वेळी केसांवर एक विशिष्ट स्थिती टिकवून ठेवावी लागते.
  • या सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वासाठी आणि पुढील पिढी निर्माण करण्यासाठी प्रजननाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, संशोधनानुसार त्यांच्या जनुकीय वैविध्यात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे नवीन अनुवांशिक बदल होण्याची शक्यता कमी होत चालली आहे.
  • संशोधकांच्या मते, ही परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात त्यांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
रात्रीच्या जेवणानंतर अजिबात करू नका 'या' चुका, अन्यथा उद्भवतील पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता वाढून शरीराचे होईल नुकसान

हे सूक्ष्मजीव मानवासाठी फायदेशीर ठरतात का?

संशोधकांनी आपल्या अभ्यासात याचे उत्तर स्पष्ट केले आहे. अनेक वर्षांपासून जगभरातील शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की या जीवांकडे शाैचासाठी प्रायव्हेट पार्टच नाही आहे. या जीवांच्या शरीरातच मल जमा होत असून या जमलेल्या मलामुळे फुटून त्यांचा मृत्यू होत असल्याचे आतापर्यंत मानले जात होते. यामुळे लोकांना त्वेचेच्या समस्या होऊ शकतात. परंतु नव्या अभ्यासाने या जुन्या सिद्धांताला पूर्णपणे चुकीचे ठरवले आहे. खरंतर या जीवांकडे मल बाहेर काढण्यासाठी एक लहान भाग असतो. याचा अर्थ त्यांच्या मृत्यूनंतर तुमच्या चेहऱ्यावर यांचा मल पसरत नाही. बँगोर विद्यापीठातील प्रख्यात प्राणीशास्त्रज्ञ हेन्क ब्रॅग यांच्या मते, “अनेकदा कोणताही ठोस पुरावा नसतानाही विविध समस्यांसाठी माइट्सना दोष दिला जातो.” ते पुढे म्हणाले की, या सूक्ष्मजीवांचा मानवांशी अतिशय जुना संबंध आहे. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी काही ना काही उपयुक्त कार्य करत असावेत, अशी शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः ते चेहऱ्यावरील रंध्रे (पोर्स) स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असावेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra